Kusum Yojana Maharashtra : नवीन कुसुम सोलर पंप योजना अनुदान वाटप शासन निर्णय आला, पहा आपण पात्र आहात का?

Kusum yojana Maharashtra : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.कुसुम सोलर योजने अंतर्गत महा ऊर्जाला सर्वसाधारण गटाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांना शासन अनुदान मिळणार आहे. 2022-23 करीतही वितरित करण्यात याबाबतचा जीआर 30 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

PM Kusum Solar yojana Maharashtra

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता “सौर कृषीपंप योजना” खाली रु. १०९.११ कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.आता प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) या अभियानाच्या घटक व (Comporant B) अंतर्गत आस्थापित होणाऱ्या पारेषण विरहीत सौर कृषीपंपातील १० टक्के शासन हिस्सा देण्यासाठी वित्त विभागाच्या सूचनानुसार अर्थसंकल्पित निधीच्या १५ टक्केच्या व विभागाकडे उपलब्ध असलेल्या निधीच्या मर्यादेत रु. १५.२७५४ कोटी महाऊर्जाला उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

PM kusum solar pump GR

राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांर्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नदी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (कुसुम) देशभरात राबविण्यात येणाऱ्या अभियानाच्या घटक व (Componant B) अंतर्गत मंजूर एकूण १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंपापैकी आस्थापित होणाऱ्या पारेषण विरहीत सौर कृषीपंपातील १० टक्के शासन हिस्सा रु.१५.२७५४ कोटी (पंधरा कोटी सत्तावीस लाख चोपन हजार फक्त) महाऊर्जाला वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत असून सदर निधी महाऊर्जाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

हे पण पहा --  Kusum yojana : खुशखबर..नवीन 2 लाख सोलर पंप बसणार! 'या' शेतकऱ्यांचा सामावेश,पहा यादी

कुसुम सोलर योजना शासन निर्णय येथे पहा

Kusum solar pump GR

Leave a Comment