Close Visit Mhshetkari

कपाशी पिकावर हेच तणनाशक वापरा | Kapus Tan Nashak

कापूस तणनाशक : कपासी पिकावर वापरता येणारे तणनाशक कोणते ? हे कसे वापरावे ? कापूस पिकातील उगवण पूर्वीचे आणि उगवण नंतर तणांचे व्यवस्थापन कसे करायचे याची सगळी माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
Cotton herbicide
Cotton herbicide

कापूस तणनाशक

यावर्षी महाराष्ट्रातील कापसाचा पेरा वाढणल्याची शक्यता आहे. 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कापूस लागवड केली आहे. आणि जवळपास उरलेल्या 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांची लागवड केली आहे.कापूस लागवडी नंतर शेताची मशागत सुरू होते आणि यामध्ये महत्त्वाचे आहे तण व्यवस्थापन.अंतर मशागतीच्या साहाय्याने फक्त न पेरलेल्या जागेतीलच तण नष्ट होते. पेरलेल्या सरीतील तण तसेच राहते. मजुरांच्या निर्माण होत चाललेल्या टंचाईमुळे हे तण काढणे लवकर शक्य होत नाही.अशावेळी कोणते ‘कापूस तणनाशक’ अधिक चांगले याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत

Quizalofop Ethyl 5% EC

‘Quizalofop Ethyl 5% EC’ हे तणनाशक रुंद पाने असलेल्या पिकातील गवत वर्गीय तण संपवण्यासाठी वापरले जाते. त्या मुळे हे कापसातही चालते. हे pre आणि post Emergence स्वरूपाचे तणनाशक आहे. उगवण पूर्वी,लागवडी पश्चात तीन दिवसांच्या आत फवारावे. उगवणी नंतर कापूस पीक 7 ते 8 पानाचा झाल्यावर फवारल्यास कापसतील गवत वर्गीय तणाला संपवते. याचे प्रमाण प्रति एकर 300ml-400ml पर्यंत वापरावे.

Pyrithiobac Sodium 10% EC

Pyrithiobac Sodium 10% EC हे एक प्रकारचे सेलेक्टिव्ह तणनाशक आहे. हे तणनाशक कापूस पिकामध्ये उगवण पूर्वी तसेच उगवणी नंतर ही वापरता येते. हे कापसातील रुंद तसेच गोल पानाच्या तणांचे नियंत्रण करते.उगवण पूर्वी वापरायचे असल्यास लागवडी नंतर तीन दिवसापर्यंत फवारायला चालते. कापूस उगवल्यानंतर कापसाला सात आठ पाने आल्यानंतर पण हे तणनाशक फवारले तर तण नियंत्रण होते. याचे वापरायचे प्रमाण: 300 ml प्रति एकर आहे.

तसेच कापूस पिकात दोन्ही प्रकारचे जसे की गवत वर्गीय आणि गोल व रुंद पानाचे तण असेल तर वरील दोन्ही प्रकारचे तण नाशक फवारले तर चालते.

Paraquat Dichloride 24 Sl

पैराक्वाट डाईक्लोराइड 24% एस.एल.(Paraquat Dichloride 24 Sl) – हे स्पर्शजन्य तणनाशक असून याचा शोध १८८२ साली झाला होता पण उपयोग १९५५ साली लक्षात आला. याची वैशिठ्य म्हणजे, ते वार्षिक गवते, रुंद पानांची व बारमाही तणे वेगाने नियंत्रित करते.

हे पण पहा --  Cotton spray : कपाशी वर दुसरी फवारणी कोणती करावी ?

फवारणी केल्यावर लगेच पाउस पडला तरी ते पाण्यात वाहून जात नाही. मातीशी स्पर्श झाला कि त्याची क्षमता नाहीशी होते. कापसाव्यतिरिक्त चहा, बटाटे, रबर, मका, द्राक्ष व सफरचंदात दोन-तीन पानावर असल्येल्या तणावर फवारावे. मुख्यपिकावर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. नागरणीशिवाय घेतल्या जाणाऱ्या भात, गहू व मक्यात याचा उपयोग पेरणीपूर्वी करावा. ओझोन नावानं हे उत्पादन बाजारात उपलब्ध आहे. एकरी डोस ६५० मिली ठेवावा

Pendimethalin 30% EC

पेंडीमिथालिन 30% ई.सी. व पेंडीमिथालिन 38.7 % सी.एस (Pendimethalin 30% EC) – पेंडीमिथालिन कोशिका विभाजन व वाढ थांबवते त्यामुळे तणाचा बीतून निघणारे अंकुर वाढायचे थांबतात. हे स्पर्शजन्य, उगवणीपूर्व व निवडक प्रकारचे तणनाशक आहे. इ.सी. प्रकारचे संयुग धनुटॉफ, हेमीपेंडा, पेंडिंमींड, पेंडीसोल, क्रोपपेंडी,नागास्त्र, पेडीमोल, पेंडोलाक्स अशा विविध नावांनी बाजरात उपलब्ध आहे.

फवारणी करते वेळी मृदेत आद्रता असणे आवश्यक आहे. कापसा व्यतिरिक्त याचा उपयोग कांदा, लसूण, सोयबीन, उडीद, मुग, गहू व भातात केला जातो. सर्वसाधारण एकरी डोस एक ते दीड लिटर चा आहे. भातात मात्र तो दीड ते दोन लिटर असा आहे. सी एस प्रकारचे संयुग आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवले जाते. ते हिटबॅक, क्लीनगार्ड, पंडोरा अशा नावांनी बाजारात उपलब्ध आहे. कापसा व्यतिरिक्त याची शिफारस सोयबीन,मिरची, कांदा या पिकात करण्यात आली आहे. याचा एकरी डोस ६५० मिली आहे.

Cotton herbicide in Marathi

FENOXAPROPP ETHYL 9.3% EC

फेनोक्झाप्रोपिथिल ९.३% इसी (FENOXAPROPP ETHYL 9.3% EC) – हे व्हीप सुपर नावाने उपलब्ध असून सोयबीन, भात, कापूस, उडीद व कांद्यात येणाऱ्या गवत वर्गीय तणावर, उगवणी नंतर, फवारले जावू शकते. फवारणी नंतर ते लगेच शोषले जाते व तणातील स्निग्धचय थांबवते.

सरकीच्या पेरणी नंतर २०-२५ दिवसाने जेव्हा तण ३-४ पानांचे असते तेव्हा याची तणावर फवारणी करावी. याची फवारणी जमिनीवर करायची नसल्याने मृदेच्या प्रकाराचा यावर परिणाम होत नाही शिवाय कापसाच्या पाठीवर कोणते पिक घ्यावे यावरदेखील कोणतेही बंधन शिल्लक रहात नाही. एकरी  ३०० मिलीचा वापर पुरेसा ठरतो.

Leave a Comment