Kabuli Harbhara : मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले काबुली हरभरे यांच्या प्रसिद्ध वणाची माहिती पाहणार आहोत यामध्ये बघायची कोरडवाहू साठी असलेल्या जातीची सविस्तर माहिती दिलेली आहे.
काबुली हरभरा जाती
विराट :- विराट वालाच्या वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास या परिपक्वता कालावधी ११०-११५ दिवस आहे. सुधारित वाणाची वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक क्षम महाराष्ट्र राज्य साठी प्रसारित करण्यात आले असून १०० दाण्यांचे वजन ३५ ग्रॅम भरते.
उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- जिरायती प्रायोगिक उत्पादन १०.१२. सरासरी उत्पादन ११
- बागायती प्रायोगिक उत्पादन ३०-३२. सरासरी उत्पादन १८
कृपा :- कृपा वाणाचे वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास पक्वता कालावधी १०५-११० दिवस आहे. हे वाण जास्त टपोरे दाणे, १०० दास्यांचे वजन ५९.४ ग्रॅम भरते मर रोग प्रतिकारकक्षम, सफेद परे दाणे असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
- सरासरी उत्पादन- १६-१८
- प्रायोगिक उत्पादन ३०-३२
पीकेव्ही – २ :– PKV वणाचा पक्वता कालावधी १००-१०५ असून वैशिष्ट्येअधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, १०० दाण्यांचे वजन ३०-४० ग्रॅम भरते.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)
बागायती उत्पादन – २६-२८
Top Gram Variety
पीके-४ :- PK – 4 वाणाचा पक्वता कालावधी १००-११० दिवस असून वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत अधिक टपोरे दाणे, मर रोगास मध्यम प्रतिकारक्षम असून १०० दाण्यांचे वजन ५०-५३ ग्रॅम भरते. विदर्भासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी) – १६-१८
RVG- 204 :- सदरील वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पक्वता कालावधी १०८-१११ दिवस असून हे वाण यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त असते.मध्यम मर रोग प्रतिकारक्षम आहे. हे वाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी प्रसारित करण्यात आले आहे.
- उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी) – २२
1 thought on “Kabuli Harbhara : महाराष्ट्रातील सर्वोत्तम सर्वोत्तम काबुली हरभरा वाण कोणते ? पहा यादी”