Income tax slabs : केंद्र सरकारने मध्यमवर्गीय नोकरदारांना (Government employees)मोठे गिफ्ट दिले आहे.Income tax स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे.7 लाखांपर्यंत करमुक्त तर मग 3 लाख रुपये उत्पन्न असेल 5% टॅक्स कसा काय? हा काय प्रकार आहे?असा प्रश्न अनेकांना पडलाय,पाहूया सविस्तर
New Income Tax Slabs | नवीन करप्रणाली
नवीन करप्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. Income tax स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे.आता 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45 हजार रुपयाचा तर 15 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर 1.5 लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार आहे.
- 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 0 टक्के टॅक्स
- 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 5 टक्के कर
- 6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 10 टक्के कर
- 9 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 20 टक्के कर
- 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर – 30 टक्के कर
50 हजार रुपये वजावटीचा मिळणार लाभ!
आता 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स बसणार नाही.मात्र 7 लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री असले तरी,3 लाखांपासून टॅक्स स्लॅबचीही घोषणा झालीय.त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.इन्कम टॅक्स संदर्भातला संभ्रम दूर करणारण्यासाठी आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत.
Standard Deduction Benefits
जर तुमचे उत्पन्न 7 लाखांच्या आत असेल तरच तुमचे उत्पन्न करमुक्त असेल.म्हणजे 3 लाखांपासूनच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लावण्यात आला आहे.पण नवीन कर प्रणालीमध्ये 50 हजार रुपयांच्या वजावटीचा समावेश करण्यात आला आहे.
उदाहरणार्थ :- जर तुमचे उत्पन्न 7 लाखांच्या आत असेल तरच तुमचे उत्पन्न करमुक्त असेल पण एखाद्याचे उत्पन्न 7 लाख 50 हजार असेल.तर 7 लाख 50 हजार मधून 3 लाखांपर्यंतच करमुक्त उत्पन्न वजा होईल आणि उर्वरित साडे 4 लाख 50 हजार कर द्यावा लागणार आहे.