Imd Weather Update : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नवरात्री उत्सव मोठ्या उत्साह सुरू असताना घटस्थापनेच्या मुहूर्तावर देशभरात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे आज आणि उद्या महाराष्ट्र सह देशात विविध ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
दिल्लीसह उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशासह राज्यातूल अनेक भागातून मान्सूनने माघारी घेतली असल्याने तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पावसामुळे देशभरातील काही भागांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाचा अंदाज
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की राज्यातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झालेली असून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशासह राज्यातील विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे.
राज्यातील विविध भागात येथे 48 तासात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून कोकणात काही ठिकाणी उमेदवार गर्जनेसह पाऊस पडणार असून कोकण किनारपट्टी त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पंजाब डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड आणि कोकणात हलका पाऊस पडणार आहे. यावेळी गोव्यातील पणजी व आजूबाजूच्या भागात या कालावधीमध्ये पावसाची शक्यता आहे.