Close Visit Mhshetkari

तणनाशक फवारणी मुळे पीक पिवळे पडले,घाबरु नका हा आहे उपाय | Herbicides side effects

Herbicides side effects : आजच्या काळात शेतकरी वर्गाला शेतातील पिकांमध्ये खुरपणीसाठी किंवा शेतीच्या इतर कामासाठी ग्रामीण भागात मजुरांची कमतरता जाणवते. पिकांमध्ये खुरपणीसाठी मजूर वेळेवर न मिळाल्यास, शेतकऱ्यांचा वेळेचे व आर्थिक नुकसान या दोन्ही गोष्टीना सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेच शेतकरी हे खुरपणीऐवजी तणनाशकाची फवारणी करून तणांचे नियंत्रण करतात.

Herbicides site effects
Herbicides site effects

तणनाशक फवारणी आणि दुष्परिणाम

तणनाशकांचा वापर वाढला आहे. परंतु, तणनाशकांचा अयोग्य आणि अतिवापर सोयाबीन व इतर पिकांवर विपरीत परिणाम करु शकतो. त्यामुळे शिफारशीनुसार तणनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून दिला जात आहे.सोयाबीन पिकातील तण करण्यासाठी नियंत्रण बाजारामध्ये अनेक प्रकारचे तण नाशके उपलब्ध आहेत.

तणनाशक फवारले आणि स्कॉचिंग आले किंवा पीक वाळत आहे किंवा पिवळे पडत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत.त्यामुळे कृषीतज्ज्ञांनी याचे नेमके कारण स्पष्ट करून उपाययोजना सुचविल्या आहेत. स्कॉचिंग किंवा पिवळे पडायला अयोग्य तणनाशकांचा वापर हे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे.

तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारणी केल्या तणनाशक आणि खत किंवा टॉनिक एकत्रित फवारणी, फवारणीसाठी कमी-जास्तप्रमाणात पाण्याचा वापर तसेच 2 किंवा 3 तणनाशके एकत्रित फवारणी केल्यास पीक वाळू शकते किंवा पिवळे पडते,असे म्हटले आहे. “तणनाशक फवारणी आणि दुष्परिणाम”

Herbicides side effects solution

तणनाशक फवारणी केल्यानंतर पीक पिवळे पडले तर करा ही उपाययोजना :-

तणनाशक फवारणी केल्यानंतर पीक पिवळे पडले तर अशावेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सर्व प्रथम जर जास्त प्रमाणात स्कॉचिंग आले असेल तर पिकाला पाळी देणे व त्यानंतर खत देणे.जर पीक पिवळे पडून वाळत असेल तर जमिनीतून युरिया खत द्यावे.

तणनाशके फवारलेल्या जमिनीत दरवर्षी कंपोस्ट,गांडूळखत या खतांचा वापर भरपूर करावा.तणनाशक वापरताना कोणतेही एकच किंवा शिफारशीत 2 एकत्र करून फवारणी करावी त्यापेक्षा जास्त एकत्र करू नयेत. तणनाशक व कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांची एकत्र करून फवारणी करू नये.(Herbicides side effects solution)

हे पण पहा --  कपाशी पिकावर हेच तणनाशक वापरा | Kapus Tan Nashak

 तणनाशक व टॉनिक किंवा खत एकत्र मिसळून फवारणी करू नये.जे तणनाशक एकत्र फवारणी करण्याची शिफारस आहे तेच एकत्र करावेत.तणनाशक फवारणीसाठी वापरलेला पंप व्यवस्थित दोन वेळा धुवून घ्यावा तसेच फवारणी झाली की धुवून ठेवावा.

कोणतेही औषध शिफाशींनुसार प्रमाण दिलेले असेल त्याच प्रमाणात वापरावे. शक्यतो सकाळी फवारणी करावी जास्त उन्ह असेल तर फवारणी टाळावी, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे.

तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी 

तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी 

1) उगवणपूर्ण तणनाशके फवारताना जमिनीत ओल असावी.

2) नॅपसॅक फवारणी पंपाचा वापर करावा. फ्लॅट फॅन किंवा

फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशकासाठी स्वतंत्र फवारणी पंप वापरावा. पंप स्वच्छ धुऊनच वापरावा.

3) फवारणी करताना हवा शांत असावी. ढगाळ वातावरणात फवारणी करू नये.

4) पाऊस न येण्याची शक्यता (किमान 2 ते 4 तास) लक्षात घेऊन फवारणी करावी.

5) कीटकनाशकांपासून तणनाशके स्वतंत्र ठेवावीत.

6) शिफारस केलेली तणनाशके संबंधित पिकासाठी,दिलेल्या मात्रेमध्ये, दिलेल्या वेळी आणि दिलेल्या पद्धतीने वापरावीत.

7) फवारणीसाठी वापरावयाचे पाणी स्वच्छ असावे.

8) तणनाशकांचा आलटून-पालटून वापर करावा.

9) तणनाशके वापरलेल्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर करावा.

10) उभ्या पिकात हुडचा वापर करावा.

11) फवारणी करताना हातमोजे, तोंडाला फडका किंवा मास्क वापरावा.

12 ) फवारणी करताना धूम्रपान करू नये, तंबाखू खाऊ नये.

13) तणनाशकची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असावा.

14)  तणनाशके फवारलेल्या जमिनीत दरवर्षी कंपोस्ट,गांडूळखत या खतांचा वापर भरपूर करावा.

15) तणनाशकची फवारणी जोराचे वारे नसताना करावी तसेच 2-3 तास सूर्यप्रकाश राहील हे पाहूनच फवारणी करावी.

टिप– तणनाशकाचा वापर करताना आपण तज्ञांचा सल्ला घ्यावा.कंटेन्ट सारखे असलेल्या कोणत्याही कंपनीचे किटकनाशकांची व टॉनिक,तणनाशक फवारणी करावी.आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नसून फक्त शेतकरी बांधवांना मदत होण्यासाठी सदरील माहिती दिली आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment