Close Visit Mhshetkari

Joint Home Loan  : तुम्ही जर तुमच्या पत्नीच्या नावावर गृहकर्ज घेतले तर तुम्हाला चांगला फायदा होणार .. पहा सविस्तर माहिती 

Joint Home Loan  : नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रत्येकालाच असे वाटत असते .की आपले एक स्वतःचे सुंदर असे घर असावे आणि घर बांधायचे म्हटलेस तर घराला पैसा भरपूर लागत असतो. त्यामुळे गृह कर्ज हे घ्यावीच लागते.

बरेच लोक गृह कर्ज घेत असताना गृह कर्जाच्या व्याजाकडे लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना महाग कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्यावर तुमचा चांगला फायदा होईल.

Joint Home Loan Benefits

तुम्हाला जर गृह कर्ज घ्यायचे असेल आणि त्यावर फायदा पाहिजे असेल तर तुम्ही संयुक्त गृह कर्ज करू शकता कारण याचे फायदे अनेक आहेत .कोणती बँक कर्ज देण्य अगोदर तुम्हाला क्रेडिट स्कोर तुमचे उत्पन्न आणि उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे. हे पाहत असते. कर्ज घेण्याइतपत पगार नसल्यामुळे किंवा क्रेडिट स्कोर खराब असल्यास किंवा तुम्हाला कोणतीही अडचण येत आहे.

बँका कर्ज देण्यास तुम्हाला नकार देत असते तुमचा पगार चांगला असेल व स्कोरही चांगला असेल तर तुम्हाला सह अर्जदाराची मदत मिळाली तर संयुक्त कर्ज घेण्यास अडचण येत नाही.

गृहकर्जावर दोन प्रकारचे कर लाभ मिळतात. मूळ रकमेच्या परतफेडीवर कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ उपलब्ध आहे. व्याज परतफेडीवर 2 लाख रुपयांपर्यंत कर सपलब्ध झालेली असून.

हे पण पहा --  Home Loan EMI : गृहकर्जाचे हप्ते व व्याज कमी कसे कराल ? काय आहे उपाय ! पहा सविस्तर..

 तुम्हाला मिळेल कर सवलत

संयुक्त कर्ज घेतले तर याचा तुम्हाला चांगलाच लाभ मिळतो तथापि यासाठी सह कर्जदार देखील खरेदी केलेल्या मालमत्तेसह मालक असावा असे नसल्यास तो कर सवलती घेऊ शकत नाही. या माय भरण्यात भागीदार असूनही त्याला त्याचा लाभ मिळणार नसतो.

जर सहअर्जदारासोबत महिला असल्यास तिला व्याजदरात देखील सवलत मिळते बँक पुरुषांच्या तुलनेत महिलांना व्याजदरात 0. 05 एवढी सवलत देते. बऱ्याच वेळेस काही बँकेंची अशी अट असते की महिला सहअर्जदारदार ही कर्ज कर्जामध्ये भागीदार सहमालक असावी तुम्ही जेव्हा तुमच्या पत्नीसह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.

तुमच्या घराची नोंद तुमच्या पत्नीच्या नावावर असल्यास किंवा संयुक्त मालकीय असल्यास मुद्रांक शुल्कातही तुम्हाला चांगल्या प्रकारे सवलत मिळते मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलते.

जर एखाद्या महिलेचे नाव मालकी हक्कात असेल तर 1 – 2 टक्के सवलत त्या महिलेला मिळत असते. तुमच्या माहितीस्तव आम्ही तुम्हाला सांगतो की हे सर्व खर्च 80C अंतर्गत समाविष्ट आहेत. म्हणजे इथेही तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल.

Leave a Comment