Close Visit Mhshetkari

Falbag yojana : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अर्ज सुरू, पहा पात्रता अनुदान, कागदपत्रे सर्व माहिती

Falbag yojana  : केंद्र सरकारनंही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण स्वीकारले आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने 2018-19 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.याविषयी सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत,अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय दि.20 जून 2018 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेला आहे.या योजनेच्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य होणार आहे. तसेच,ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे.

फळबाग योजना तीन टप्प्यात शेतकऱ्यांना अनुदान

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी शेतकऱ्यांना तीन टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाते.पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. फळपिकानुसार अनुदानाची रक्कम बदलते. तर, दरवर्षी एप्रिल महिन्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी वृत्तपत्रात आणि इतर माध्यमात जाहिरात दिली जाते आणि शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेतले जातात.

फळबाग योजना आवश्यक कागदपत्रे

1) सातबारा व आठ अ उतारा
2)हमीपत्र
3)संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांची संमती पत्र
4)जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी).

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थ्याला फळबाग लागवडीसाठी “Mahadbt”आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था करणे बंधनकारक असेल.
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर ती जमीन असणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्याची जमीन संयुक्त मालकीची असेल तर त्यावेळेस इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या आयुष्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
  • शेतकऱ्याने अगोदर या योजनेचा “Mahadbt” लाभ घेतलेला नसावा.
  • शेतकरी आयकर भरणारा नसावा.
  • शेतकऱ्यास सरकारी नोकरी नसावी.
  • क्षेत्र मर्यादा –किमान 0.20 हे. व कमाल 6.00 हे. पर्यंत लाभ घेता येइल.
फळबाग लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर
  1. आंबा कलमे (10×10 मी)- 53900 रु.
  2. आंबा कलमे(5×5 मी)- 102530 रु.
  3. पेरु कलमे (6×6 मी)- 62472 रु.
  4. संत्रा मोसंबी व कागदी लिंबू कलमे (6x 6मी)- 62578 रु.
  5. सिताफळ कलमे (5x 5 मी)-72798 रु.

योजनेसाठी अर्ज कसा भरायचा | How to apply falbag scneme Maharashtra

  • शेतकरी मित्रांनो प्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टल उघडावे लागेल.
  • महाडीबीटी पोर्टल उघडल्यानंतर प्रथम तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून महाडीबीटी पोर्टल वरती लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनी विषयीचा तपशील टाकावा लागेल.
  • तसेच तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती व शेतातील पिकाविषयी ची माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा पर्याय निवडावा लागेल.
  • शेवटी तुम्हाला अर्जाचे शुल्क भरावे लागेल.

मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकता.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment