Close Visit Mhshetkari

Dussehra puja : कधी आहे दसरा शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा,विधी,कथा संपूर्ण माहिती

Dussehra puja : शास्त्रात दसरा सणाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, दसरा दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो.नवरात्राची सांगताही याच तिथीला दुर्गा विसर्जनाने केली जाते.तर आज या जाणून घेऊया दसरा सणाचा शुभ मुहूर्त,कथा पुजा सर्व माहिती.

विजयादशमी पूजा शूभमुहूर्त

ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी दसऱ्याला तीन महत्त्वाचे शुभ योग आहेत.ज्योतिषशास्त्राच्या गणनेप्रमाणे या दिवशी सुकर्मा, धृती आणि रवी योग जुळून येत आहेत. त्यामुळे या वर्षीचा दसरा वैशिष्ट्यपूर्ण असेल

आश्विन शुक्ल दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते. यावेळी आश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.20 पासून सुरू होईल. बुधवार,5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता दशमी तिथी समाप्त होईल.या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:07 ते 2:54 पर्यंत असेल.पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 2.13 ते 3 पर्यंत आहे.

या दिवशी रवी योग सकाळी सहा वाजून 21 मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून 18 मिनिटांपर्यंत आहे. सुकर्मा योग सकाळी आठ वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. या शिवाय धृ योग सकाळी आठ वाजून 21 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून 19 मिनिटांपर्यंत असेल.

दसरा सणाविषयीच्या अख्यायिका कथा

हिंदूं धर्माचा महत्त्वाचा ग्रंथ रामायणानुसार,विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला म्हणून अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो.या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले,अशीही आख्यायिका आढळून येते.त्यामुळे दसऱ्याला विजयादशमी असेही संबोधतात.दुसऱ्या एका कथेनुसार,दुर्गादेवीनं अश्विन शुक्ल दशमीला महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. युद्धावेळी सर्व देवांनी दुर्गादेवीला शस्त्रास्त्रे पुरवली होती.

हे पण पहा --  Dussehra puja : विजया दशमी शुभमुहुर्त,दसरा सणाचे महत्व,पूजा विधी

Dussehra Vijaydashmi

विजया दशमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा (Lord Sri Ram Puja) केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते. याशिवाय योद्धेही शस्त्रास्त्रांची पूजा करतात.चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नव साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो.

नवरात्रीची सांगता, रावण दहन आणि दिवाळीची चाहूल घेऊन येणारा दसरा यंदा 4 ऑक्टोबर रोजी आहे.या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असते.या दिवशी शिक्षणाची,नवीन कार्याची,मंगल कार्याची नांदी सुरू होते.दिवाळीचे वेध लागतात. Dussehra Vadashmi 2022 मतभेद विसरून,आपट्याची पान दऊन पा झळाळी दिली जाते, तो हाच सोनेरी दिवस.

Vijayadashami Puja Marathi mahiti

दसऱ्याच्या दिवशी आपण वाहनांची, शस्त्राची आणि शैक्षणिक साहित्याची पूजा करतो.पाटीवर,वहीवर अंकांची सरस्वती रेखाटून त्याची पूजा केली जाते.

  • दसऱ्याच्या दिवशी देशातील अनेक ठिकाणी सायंकाळी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.
  • या दिवशी महिषासुरला माता दुर्गेने मारले,म्हणून दुर्गा मातेची पण पूजन केले जाते.
  • हिंदू धर्मात या दिवशी शस्त्रांच्या पूजेला खास महत्व आहे.
  • या दिवशी आपट्याच्या झाडाची पूजा करून त्याची पाने देण्याची परंपरा आहे.
  • हिंदू धर्मात या दिवशी नवीन काम सुरु करण्याची,वस्तू वाहन खरेदी करण्याची,तसेच नवीन कपडे खरेदी करून घालण्याची प्रथा आहे.
  • या दिवशी गोर गरिबांना भेटवस्तू,उपयुक्त सामान,अन्नधान्य तसेच मिठाई दान दिली जाते.

टिप :- वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

Leave a Comment