Close Visit Mhshetkari

Cotton spray : कपाशी वर दुसरी फवारणी कोणती करावी ?

Cotton spray : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचे सध्या कपाशी वरती दुसऱ्या फवारणीची लगबग सुरू असून अशावेळी मावा तुडतुडे पांढरीमाशी असा बंदोबस्त करण्यासाठी कपाशीवर दुसरी फवारणी कोणती करावी या संबंधित सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत तर चला बघूया सविस्तर माहिती

कपाशी फवारणी करताना घ्यावयाची काळजी

कपाशी लागवडीनंतर साधारणपणे 40 ते 50 दिवसांच्या दरम्यान कपाशी पिकावर दुसरी फवारणी करावी. यामध्ये आपण अतिशय कमी खर्चात आणि प्रभावी किटकनाशक,टॉनिक व बुरशीनाशकाचा सामावेश करावा.

  1. किटकनाशक फवारणी करताना औषधाचे प्रमाण कमी जास्त करु नये.
  2. औषध फवारणी करताना जास्त औषधाची एकत्र फवारणी करू नये.
  3. जर पावसाचे आणि खुप दिवसापासून साठलेले पाणी असल्यास फवारणी टाळावी.
  4. दुपारनंतर पाऊस येत असल्याने फवारणी करताना स्टिकर चा वापर करावा.

Cotton second Spray

  1. उलाला (8 ग्रॅम) + साफ / बाविस्टीन 12.61.00 (100gm)
  2. आलीका (8-10 मिली ) + साफ / बाविस्टीन + 12.61.00
  3. लान्सरगोल्ड (30 ग्रॅम) + साफ / बाविस्टीन + 12.61.00
  4. रोगर (30 मिली) + साफ / बाविस्टीन + 12.61.00
हे पण पहा --  कपाशी वर पाचवी फवारणी हिच करा : cotton spray

वरीलपैकी कोणतेही एक काँम्बीनेशन घेऊन दुसरी फवारणी घेतल्यास चांगला परिणाम मिळेल.

कपाशी दुसरी फवारणी

आपण कपाशी वर पहिली फवारणी करताना खालील किटकनाशक व टॉनिक फवारणी केल्याचा सल्ला दिला होता

  • Comfidore + Biovita / 19:19:19
  • Actara + Biovita / 19:19:19
  • Rogor Insecticide + Biovita / 19:19:19

टिप– वरील उत्पादनाचा वापर कपाशी दुसरी फवारणी करताना आपण तज्ञांचा सल्ला घ्यावा.कंटेन्ट सारखे असलेल्या कोणत्याही कंपनीचे किटकनाशक,टॉनिक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नसून फक्त शेतकरी बांधवांना मदत होण्यासाठी सदरील माहिती दिली आहे.

Leave a Comment