Close Visit Mhshetkari

Bridge Course सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय? पहा अभ्यासक्रम,वेळापत्रक,चाचणी सर्व माहिती

Bridge Course : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन व्हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

Bridge course Maharashtra
Bridge course Maharashtra

Bridge Course Maharashtra

राज्यस्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरु” या उपक्रमांतर्गत विद्याथ्र्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरु राहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप

>> इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

>> सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

>> पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय

कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

>> सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

>> सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

>> सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील • याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

>> पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै / दि.६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत • संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी

1) पूर्व चाचणी दि. १७ ते १८ जून २०२२.विदर्भ भागातील शाळा –  दि.०१ ते ०२ जुलै २०२२

2) ३० दिवसांचा सेतू अभ्यास – २० जून ते २३ जुलै,२०२२, विदर्भ भागातील शाळा – ४ जुलै ते ६ ऑगस्ट,

3) उत्तर चाचणी –  दि. २५ ते २६ जुलै २०२२.विदर्भ भागातील शाळा. दि. ८ ते १० ऑगस्ट, २०२२

सेतू अभ्यासक्रम इयत्ता पहिली ते आठवी

इयत्ता पहिली ते आठवीचा सेतू अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

लिंक केवळ शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत. सर्व हक्क SCERT पुणे यांच्या स्वाधीन आहेत.

१) सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्याथ्र्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

२) सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

३) मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेयकामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

४) सदर कृतीपत्रिका (workshoots) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

५) शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्याथ्र्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षितआहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

६) सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

७) सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.

८) शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसाठी दि. ९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते.यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल.

सेतू अभ्यासक्रम चाचणी

उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झालेनंतर शाळा भेटींच्या आधारे सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल पुढील 15 दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास विनाविलंब सादर करावा लागणार आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment