SBI Bank : नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचे देखील एसबीआय मध्ये खाते असणारच तर तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसापासून एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
त्यामध्ये असा उल्लेख केला जात आहे. की तुमचे खाते पॅन कार्ड ची लिंक केले नाही .तर तुमचे खाते ब्लॉक केले जाईल जर तुम्हाला या मेसेज आला असेल. तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याविषयीची माहिती जाणून घ्या.
SBI new update
या माहितीचा पाठपुरावा करता इन्फॉर्मेशन ब्युरोने माहिती सांगितली आहे की गेल्या काही दिवसापासून फसवणूक करणारे स्टेट बँकेच्या नावाने लोकांना संदेश पाठवत आहेत तुम्ही पण तुम्ही पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक केली नाही तर तुमचे खाते बंद होणार.
तसेच तुम्हाला कॉल किंवा कोणत्याही लिंक द्वारे पण माहिती अपडेट करण्याचा सल्ला देखील दिल्या जात आहे. असा काही मेसेज आला तर चुकूनही त्या मेसेज वरती विश्वास ठेवू नका हा एक फसवट मेसेज आहे. या प्रकरणाची माहिती देताना पीआयबी फॅक्ट चेकने अत्यंत गंभीर खुलासे केले आहेत.
State Bank of India information
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नेहमीच आपल्या ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून सावधगिरी बाळगण्यासाठी सूचना देते. बँक कोणालाही कॉल किंवा मेसेज करून त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती अपडेट करण्याचा सल्ला देत नाही. बँक पॅन तपशील अपडेट करण्यास सांगणारी कोणतीही लिंक पाठवत नाही1930 या क्रमांकावर किंवा रिपोर्ट.phishing@sbi.co.in या ईमेलद्वारे तक्रार करू शकतो.
सायबर गुन्ह्याचा बळी पडला असाल तर, खालील गोष्टी करू शकता
- ताबडतोब तुमच्या बँकेला कळवा.
- पोलिसात तक्रार करा.
- सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार करा.
- तुमच्या सर्व डिजिटल खात्यांची पासवर्ड बदला.
SBI ने सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. बँक त्याच्या वेबसाइटवर आणि मोबाइल अॅपवर सायबर सुरक्षा टिप्स प्रदान करते.