Close Visit Mhshetkari

प्रधानमंत्री जन धन योजना मराठी माहिती PMJDY In Marathi

PMJDY in Marathi :  बँक,पैसे पाठविण्याची सुविधा, कर्ज, विमा,पेन्शन यासारख्या वित्तीय सेवा नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात,यासाठी हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले. आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक सल्लागार मनीषा सेन शर्मा यांनी उद्योग संस्था ॲसोचॅम (ASSOCHAM) च्या एका कार्यक्रमात सांगितले की, पीएम जन धन योजनेला सुरुवातीपासूनच खूप यश मिळाले आहे.

pm jan dhan yojana
pm jan dhan yojana

पंतप्रधान जनधन योजना 2 लाखांचे अपघाती संरक्षण

पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) अंतर्गत,तुम्हाला अनेक प्रकारची आर्थिक मदत दिली जाते. एवढेच नाही तर तुम्हाला कोणताही प्रीमियम न भरता ” पंतप्रधान जनधन योजना 2 लाखांचे अपघाती संरक्षण” दिले जाते.28 ऑगस्ट 2018 नंतर खाते उघडणाऱ्या खातेधारकांना २ लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळू लागले आहे.

ऑक्टोबर 2021 पर्यंत सुमारे 44 कोटी लाभार्थी बँकांशी जोडले गेले आहेत आणि या योजनेद्वारे लोकसंख्येतील वंचित घटकांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात सरकारला यश आले आहे.”प्रधानमंत्री जन धन योजना” विशेषतः समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी अतिशय लाभदायक योजना आहे.शून्य बॅलन्सवर बँक खाती उघडण्यासाठी आणि कर्ज आधारित, हस्तांतरण सुविधा, विमा आणि निवृत्तीवेतनाची सुविधा तसेच, बँकिंग / बचत, ठेवी खाते, रेमिटन्स, कर्ज, विमा, निवृत्तीवेतन इत्यादी आर्थिक सेवा या योजनेअंतर्गत सर्वांना प्रभावीपणे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री जन धन योजनेचे फायदे

१) कोणत्याही बँकेमधून झिरो बॅलन्स बचत खाते उघडता येते म्हणजेच, किमान शिल्लक ठेवणे आवश्यक नाही.

२) खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते.

२) बँकेतील ठेवींवरील व्याज मिळते.

३) लाभार्थीना रु. 2,00000/- ( दोन लाख रु. फक्त ) रुपयांचा अपघात विमा संरक्षण प्राप्त होते.

४) प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत लाभार्थीच्या मृत्यूच्या सामान्य शर्तीची भरपाई केल्यास रु.30,000/- ( तीस हजार रु. फक्त ) रुपयांचा जीवन विमा देण्यात येतो.

५) भारतभर निधी सहज हस्तांतरण (Easy Fund Transfer).

६) सरकारी योजनेतील लाभार्थ्यांना या खात्यांमधून थेट लाभ मिळेल.

७) सहा महिन्यांपर्यंत या खात्यांच्या समाधानकारक व्यवहार झाल्यास ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल.

८) लाभार्थीच्या प्रति परिवाराला रु.10,000/- इतकी ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एका खात्यात उपलब्ध आहे, ही सुविधा मुख्यतः कुटुंबातील महिलांसाठी मिळते. 

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

1 thought on “प्रधानमंत्री जन धन योजना मराठी माहिती PMJDY In Marathi”

Leave a Comment