Close Visit Mhshetkari

कापूस यावर्षी पण भाव खाणार ! Cotton Rate

Cotton Rate : देशातील वायद्यांबाजारामध्ये कापसाच्या दरात मोठी वाढ झाली. ऑगस्ट आणि डिसेंबरच्या वायद्यांमध्ये खंडीमागे तब्बल ३१ हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळं एमसीएक्सवर कापसामध्ये सट्टेबाजी होत असल्याचा आरोप कापड उद्योग (Textile Industry) करतोय.

देशात कापसाचा मोठा तुटवडा असल्याने कापूस बाजार भाव वाढले,असे जिनिंग आणि सुतगिरण्यांचे म्हणणे आहे.मात्र देशातील वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता दर पाहून देशात यंदाही शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल,असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

Cotton rates
Cotton rates

Cotton Market Price

देशात सध्या खरिपाच्या पेरण्या सुरु आहेत. लागवडीच्या ताज्या आकडेवारीनुसार कापसाखालील क्षेत्र सध्या वाढलेलं आहे. मात्र मागील हंगामात कापूस उत्पादन जवळपास २० टक्क्यांनी कमी राहीलं. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते देशात २०२१-२२ च्या हंगामात ३१५ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले,मात्र देशात कापसाचा वापर ३० टक्क्यांनी वाढला. त्यामुळं देशात कापसाच्या दरात तेजी आली होती.
कापूस दर ऐन आवकेच्या काळातही तेजीत होते. सध्या देशातील बाजार समित्यांमधील सरासरी कापूस दर १० हजरा ६२१ रुपये प्रतिक्विंटलवर आहेत.बाजार समित्यांमध्ये कापसाचा दर कमी असला तरी वायद्यांमध्ये मात्र मोठी उलथापालथ सुरु आहे.

Cotton Rate In Global Market

देशात कापसाचे वायदे वाढले असताना आंतरराष्ट्रीय बाजारात  कापसाचे दर कमी आहेत. न्यूयाॅर्क येथील इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज अर्थात आयसीईवर ऑगस्टचे वायदे १०६.९१ सेंट प्रतिपाऊंडने झाले. खंडीमध्ये हा दर ६७ हजार २४१ रुपये होतो. तर डिसेंबरचे वायदे १०१.८०० सेंटने झाले.म्हणजेच ६४ हजार खंडीने हा कापूस मिळेल.म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाले आहे.त्यामुळे सुरुवातीच्या काळात असेलेली कापूस लागवडीतील वाढ सध्या कमी झाली.

Cotton Market Price

साधारणपणे देशातील वायद्यांचे दर न्यूयार्क वायद्यांपेक्षा कमी असतात.पण १० वर्षांत पहिल्यांदाच देशातील दर अधिक आहेत. सध्या देशातील कापसाचा भाव ६० टक्क्यांनी जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आयसीईवरील दरानुसार व्यवहार होतात. त्यामुळं देशातून सूत,कापूस आणि कापड निर्यात घटली.मात्र देशात कापसाचा पुरवठाच कमी आहे.
देशातील उद्योगाने कापसाचा वापर ३० टक्क्यांपर्यंत कमी केला तरी गरज भागणार नाही,असे कापूस निर्यातदार अविनाश काबरा यांनी सांगितले. तसेच कापसाचे दर केवळ देशातच वाढले नाहीत तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस बाजार भाव तोऱ्यात आहे,असंही त्यांनी नमूद केले आहे.

कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

दरवर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस पीक धोक्यात येत असते. त्यामुळं उत्पादनात घट येते. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला झाल्याने कापसाची झाडे मोठ्या प्रमाणात मरत  आहेत.अशात कापसाचे पीक कसे वाढवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.मोठ्या प्रमाणावर महागडे असणारे बियाणे, तसेच मशागत आणि औषधे यांच्यावर शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे.
अशातच आता कापसाची उभी झाडे मोठ्या प्रमाणात मरत असल्यानं पिकासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून,खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
कापूस उत्पादनात घट होणार !

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ,मराठवाडा, खान्देशात सुध्दा महिनाभरापासून अतिवृष्टी मुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक भागांत शेतात तीन-तीन फुट पाणी साचल्याने पिकांवर रोगराई वाढली आहे.कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढलाय.या भागात सलग तिसऱ्या वर्षी कपाशीचं पीक हातचं जाण्याची वेळ आली आहे.

हे पण पहा --  यावर्षी पण कापूस बाजार भाव तोऱ्यातच.. Cotton rate

नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील 62 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 5 लाख 25 हजार 759 शेतकऱ्यांच्या 4 लाख 77 हजार 064 हेक्टर क्षेत्रांवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.अशा सर्व परिस्थितीत या वर्षी पण कापूस उत्पादनात  घट होणार हे नक्की आहे.त्यामुळे या वर्षी पण कापूस पुन्हा भाव खाणार आहे यात शंका नाही.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment