Dearness Allowance : 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा शासन आदेश निर्गमित होणार ? विविध संघटनेकडून सरकारकडे ..

Dearness Allowance : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून 53 टक्के दराने महागाई भत्ता चे गिफ्ट दिलेली आहे.

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने डीए मिळत परंतु महाराष्ट्रात मध्यंतरी विधानसभा निवडणूक लागल्याने आचारसंहिता लागली होती परिणामी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत आहे.

Dearness Allowance Hike update

आता निवडणुका संपून महिना उलटला असला तरी सुद्धा कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढची गिफ्ट मिळालेले नाही परिणामी विविध संघटने कडून महागाई भत्ता वाढ करण्याचे निवेदन सरकारकडे देण्यात येत आहे.

केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार तथा नागो गाणार व नागपूर विभागाचे कोषाध्यक्ष संतोष द.सुरावार यांनी सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

हे पण पहा --  Good news दिवाळीचे मोठे गिफ्ट, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38% झाला | DA Hike updates

मगर भत्ता वाढ व फरक मिळणार !

1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकी सह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घोषित करावा, अशी राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची भावना असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शासनाने आदेश त्वरित निर्गमित करून थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता जानेवारी 2025 च्या वेतनासोबत वितरित कर्ण संदर्भात शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment