Close Visit Mhshetkari

Cotton Market : कापसाचे वायदे सुरु झाल्याने बाजारभाव वाढतील का? पहा आजचे ताजे कापूस बाजार

Cotton Commodity Market : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे.शेतकरी,व्यापारी आणि उद्योगांची काही महिन्यांपासून असलेली मागणी आता पूर्ण होणार आहे.परिणामी कापूस बाजार भावात सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Cotton Commodity Market update

कापूस वायद्यांवरील बंदी उठवली आहे.मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवरील कापूस वायदे 13 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.त्यामुळे कापसाचे वायदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कॉटन वायदे सुरू होण्यास किमान 10 दिवस लागतील,अशी माहिती च्या सूत्रांनी दिली. कापसावरील वायदे एप्रिल,जून आणि ऑगस्ट महिन्यातील वायद्यांमध्ये व्यवहार करता येईल.

Kapus Bajar update

कापसाचे वायदे सुरु झाल्यानंतर कापूस बाजारालाही आधार मिळू शकतो,असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

दक्षिण भारतातील कापड उद्योग लॉबीच्या सदस्यांनी विरोध दर्शविताच PAC चे अध्यक्ष पी.राजकुमार, सुरेश कोटक,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष बी.एस.राजपाल यांनी बंदी हटविण्याच्या समर्थनात भूमिका मांडली.जिनिंग प्रेसिंग आणि सूत गिरणी संघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीला समर्थन दिले होते.त्यामुळे बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे पण पहा --  Mcx cotton soybeans rate : सोयाबीन व कापूस बाजार भावामधे मोठा बदल.. पहा आजचे ताजे बाजार भाव !

Leave a Comment