Credit Card UPI link : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ने डिजिटल पेमेंटचे जग बदलले आहे. या प्रणालीचा वापर करून आपण क्षणार्धात कुठे आणि कधीही पेमेंट सेंड किंवा रिसीव करू शकतो.
Credit Card UPI linking System
रिझर्व्ह बँक इंडिया (RBI) ने UPI शी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची सुविधा नुकतीच सुरू करून दिली आहे. सदरील सेवा कोणत्या कार्ड्समध्ये उपलब्ध आहे ? UPI शी क्रेडिट कार्ड लिंक करण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
मित्रांनो आपल्याला माहिती आहे कीयुनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ने डिजिटल पेमेंटच्या जगात क्रांती केली आहे. याच्या मदतीने तुम्ही भाज्या खरेदी करण्यापासून ते बिल भरण्यापर्यंत सर्व काही करू शकता.
निधी हस्तांतरण देखील क्षणार्धात केले जाते. आरबीआय ने नुकतेच फिजिकल कार्ड नसतानाही क्रेडिट कार्ड वापरण्याची परवानगी दिली आहे.
UPI Credit Card Linked Benefits
आता प्रश्न पडतो की क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करावे का? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्याने काय फायदा होतो?
1) UPI शी क्रेडिट कार्ड लिंक केल्याने अनेक फायदे आहेत. युपिआय सर्वत्र स्वीकारले जात असल्याने, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा क्रेडिट कार्डचा वापर करता येणे सुलभ होऊ शकते जसे की भाजी विकत घेणे असो चहा पिणे इत्यादी
2) आपल्याला क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी साधारणपणे 40 ते 50 दिवसांचा कालावधी मिळतो त्यामुळे upi सोबत लिंक केलेल्या क्रेडिट कार्डच्या पेमेंट वरही तुम्हाला याचा फायदा मिळतो शिवाय अतिरिक्त भार पडणार नाही.
3) तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी लिंक केलेले क्रेडिट कार्ड देखील वापरू शकता, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रयत्नाशिवाय जागतिक सुलभता मिळते. तसेच, चलन रूपांतरण करण्याची आवश्यकता नाही.
4) आपण आपले क्रेडिट कार्ड एपीआय ला लिंक केल्यामुळे अनेक प्रकारचे कॅशबॅक व रिव्हर्स पॉईंट सुद्धा आपल्याला उपलब्ध होतात याचा नक्कीच फायदा मिळवता येतो.
Loss of UPI Credit Card linking
UPI सोबत क्रेडिट कार्ड लिंक करण्याचे काही नुकसान आहे का?
1) सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे UPI सोबत फक्त RuPay क्रेडिट कार्ड लिंक केले जाऊ शकतात. थोडक्यात जर तुमच्याकडे मास्टरकार्ड किंवा व्हिसा कार्ड असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही.
2) व्यापाऱ्यांना क्रेडिट कार्डशी लिंक केलेल्या UPI द्वारे पेमेंटवर व्यापारी सवलत दर (MDR) आकारला जाईल. त्यामुळे साहजिकच व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे.
3) क्रेडिट कार्डचा फालतू खर्च वाढत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास हा ट्रेंड आणखी वाढू शकतो
तेव्हा आपण सर्व गोष्टींचा विचार करूनच क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याचा निर्णय घ्यावा.