Close Visit Mhshetkari

SIP Investment : एसआयपी गुंतवणुकीतून जास्त फायदा हवाय? मग लक्षात ठेवा `या` 4 गोष्टी …

SIP Investment : नमस्कार मित्रांनो आर्थिक गुंतवणूक ही भविष्यासाठी केव्हाही उत्तम ठरत असते सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची असल्यास आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असायला हवी.

Systematic Investment Plan

सध्या म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा कल वाढलेला आहे असे असले तरी आम्हाला जास्त रिटर्न मिळाला नाही. अशी ओरड बरेच जण करताना दिसत असतात.पण आपण केलेल्या काही चुका छोट्या आपल्याला कमी रिटर्न्स देण्यासाठी कारणीभूत ठरतात.

मित्रांनो म्युच्युअल फंडातील एसआयपी च्या माध्यमातून तुम्ही छोट्या रकमेतून मोठ्या फंडात रूपांतर करू शकता. एसआयपी ही मार्केट सोबत लिंक असल्याने यामध्ये रिक्स सुद्धा असते.

Mutual fund Investment Tips

खालील 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात, तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करताना चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

रिसर्च करा :- SIP सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टींचा शोध घेणे आवश्यक असते. नेहमी कोणतीही रेसिपी घेण्याअगोदर त्यावरती संशोधन करावे. ज्यामध्ये कंपनीचा पोर्टफोलिओ कसा आहे तिचं मार्केट कॅप किती त्याचबरोबर मागील पाच ते दहा वर्षापासून मिळणाऱ्या रिटर्नचा सुद्धा अभ्यास करावा.तुमच्या सल्लागाराची मदत घ्या.यामुळे तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो.

छोट्या रक्कमे पासून सुरुवात

मित्रांनो जास्त रक्कम नाही म्हणून एस आय पी मध्ये गुंतवणूक करत नाही अशी ओरड अनेकजण करतात, पण मित्रांनो एस आय मध्ये गुंतवणूक करताना अगोदर छोट्या रकमेपासूनच सुरुवात करावी कारण एकदम मोठ्या रकमेमध्ये गुंतवणूक केल्यास तोटा सुद्धा किंवा नुसकान देखील मोठे होऊ शकते.त्यामुळे छोट्या छोट्या रक्कमेच्या 2 ते 3 एसआयपी सुरु करु शकता.

हे पण पहा --  SIP investment : आपल्याला कोट्याधीश बनवेल 555 चा हा फॉर्म्युला ? फक्त 2 हजार पासून सुरु करा गुंतवणूक ; जमेल मोठी रक्कम

एसआयपी अचानक बंद करु नका

SIP मध्ये मध्ये गुंतवणूक करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की, गुंतवणूक लांब टर्म साठी असेल तरच फायदा होत असतो. जितका जास्त काळ तुम्ही गुंतवणूक कराल तितका रिटर्न तुम्हाला जास्त मिळू शकतो. मध्येच एसएपी बंद केल्यास तुमच्या तुम्हाला चांगला रिटर्न मिळेलच असे सांगता येत नाही किंवा आपला आवाज सुद्धा होऊ शकतो.

बरीच मंडळी उत्साहात एसआयपी ला सुरुवात करतात आणि बाजारात अचानक मंदी आल्यास, किंवा बाजार पडल्यास एस आय पी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेतात. यामुळे आपला नक्कीच तोटा होणार तेव्हा अशा गोष्टी टाळायला हव्यात.

गुंतवणुकीचे टार्गेट ठरवा

आपण SIP सुरू करण्यााधी एसआयपी रक्कम गुंतवणुकीचे टार्गेट ठरवायला हवे. आपल्या मुलाचे लग्न शिक्षण रिटायरमेंट नंतर आपल्याला एसआयपी पडेल याचं प्लॅनिंग आपण करू शकता सदरील कामासाठी तुम्हाला किती पैसे लागणार यानुसार आपण एसआयपीच्या गुंतवणुकीचा अंदाज घ्यावा.

Leave a Comment