Close Visit Mhshetkari

Investment tips : SBI RD किंवा SIP Investment पैकी सर्वाधिक नफा कोठे मिळणार ! पहा कोठे करावी गुंतवणूक? 

Investment tips : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या जगभरातील लोक सुरक्षित गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. यामध्ये बँक किंवा पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, परंतु यामध्ये परतावा हवा तसा मिळत नाही. त्या उलट म्युच्युअल फंड किंवा एसआयपी मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळत असतो.यामध्ये रिक्स सुद्धा असते .अशावेळी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करावी याविषयी उदाहरणासह आपण माहिती पाहणार आहोत.

SIP Vs SBI RD Investment

आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेअर बाजारातील जखम घेऊ शकत असाल तर आपल्याला गुंतवणुकीसाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा चांगला पर्याय ठरू शकतो. 

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एक वर्ष ते दहा वर्षाच्या आरडी वरती साधारणपणे वार्षिक 6.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. 

SIP चा विचार केला तर ते बाजारातील जोखीम घेतात, परंतु परतावा खूप आकर्षक असतो.दीर्घ मुदतीत बहुतांश योजनांचा सरासरी एसआयपी परतावा वार्षिक १२ % राहिला आहे.

हे पण पहा --  Retirement Plan : रिटायरमेंटनंतर कमाईचे साधन नसल्यास SBI करणार मदत ! पहा कसा घेता येईल फायदा?

SIP Mutual funds Investment

समजा तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला ₹5,000 ची SIP सुरू करता. जर सरासरी वार्षिक परतावा 12% असेल तर 2 वर्षानंतर तुम्हाला ₹1,36,216 मिळू शकतात. यामध्ये तुमची गुंतवणूक ₹1.20 लाख आणि अंदाजे संपत्ती लाभ ₹16,216 असेल.

SBI Recurring Deposit

SBI RD मध्ये कमीत कमी ₹100 आणि त्यानंतर ₹10 च्या पटीत गुंतवणूक केली जाऊ शकते.

1 वर्ष ते 2 वर्षांच्या RD वर SBI नियमित ग्राहकांना 6.75% वार्षिक व्याज देते.

जर तुम्ही दर महिन्याला ₹5,000 गुंतवणूक सुरू केली तर 2 वर्षानंतर तुम्हाला ₹1,28,758 मिळतील.

यामध्ये तुमची गुंतवणूक ₹1.20 लाख आणि व्याज उत्पन्न ₹8,758 असेल.

Leave a Comment