Close Visit Mhshetkari

Mudra Loan : ‘या’ सरकारी स्कीममध्ये मिळते बिझनेस सुरू करण्यासाठी 10 लाखांचे लोन, असा करू शकता अर्ज?

Mudra Loan : आपल्याला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर सरकारची पीएम मुद्रा योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली होती. 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

सदरील योजनेअंतर्गत बिगर कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. सदरील कर्ज मुद्रा लोन म्हणून सुध्दा ओळखले जाते.

मुद्रा कर्ज योजना ही लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) कर्ज देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत,उद्योजक ₹50,000 ते ₹10 लाख पर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.

Types of PM Mudra Yojana

1. शिशू :- या श्रेणीत ₹50,000 पर्यंतचे कर्ज मिळते. नवीन उद्योजक आणि ज्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी निधीची आवश्यकता आहे अशा उद्योजकांसाठी ही श्रेणी आहे.

2. किशोर :- सदरील श्रेणीत ₹5 लाख पर्यंतचे कर्ज मिळते.ज्या उद्योजकांनी आधीच व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकता आहे अशा उद्योजकांसाठी ही श्रेणी आहे.

हे पण पहा --  Mudra Loan : 10 लाखापर्यंत लोन मिळवा घरबसल्या मोबाईल वरुन 2 मिनिटात

3. तरुण :- मुद्रा लोन श्रेणीत ₹10 लाख पर्यंतचे कर्ज मिळते.ही मुद्रा कर्ज योजनेतील सर्वाधिक रक्कम आहे.आवश्यक पात्रता पूर्ण करणारे उद्योजक ₹10 लाख पर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.

मुद्रा कर्ज योजना पात्रता

  • भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
  • पात्र व्यवसायासाठी कर्ज घेणे आवश्यक आहे.
  • योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
How to Apply Mudra Loan

तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही उद्यम मित्र पोर्टल www.udyamimitra.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

“अर्ज करा” बटणावर क्लिक करा.

आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज जमा करा.तुमचा अर्ज अनेक कर्ज देणाऱ्या संस्थांना दिसेल

  • अधिक माहितीसाठी मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
  • मुद्रा योजनेच्या टोल-फ्री नंबरवर कॉल करा: 1800-180-1111

Leave a Comment