Close Visit Mhshetkari

Cotton crop season : नोव्हेंबर मध्ये कापसाचे दर असतील तेजीत, पहा काय मिळेल भाव

Cotton crop season : देशातील खरीप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. या यंदाच्या खरीप हंगामामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे कापूस उत्पादकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस आहे त्यांना सुगीचे दिवस येण्याची चिन्हे दिसत आहेत.

कापूस बाजार भाव 2023

देशातील हरियाणा,पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील काही मंडईंमध्ये कापसाची नवीन आवक सुरू झाली आहे.अमेरिकेत यंदा कापूस  पिकाच्या कमकुवतपणामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘कापूस बाजार भाव  दीडपट जास्त आहेत.पण भविष्यात परिस्थिती कशी राहिल हे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशात सध्या कापूस दर स्थिर आहेत.परंतु पुढे नोव्हेंबरमध्ये कापूस बाजार भावात तेजी येईल तसेच देशात कापसाची मागणी कायम राखण्यासाठी सूतगिरण्यांनाही वित्तीय सहायता वाढवावी,असा मुद्दा नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशनचे  माजी अध्यक्ष महेश शारदा यांनी व्यक्त केला..

सध्या कापसाला मिळतोय चांगला भाव

दर वर्षी पेक्षा यावर्षी कापूस लागवड वाढली असली तरी यंदा कापसाला चांगला दर मिळणार,असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सध्या देशात कापसाला प्रतिक्विंटल 10,000 रुपये सरासरी दर मिळत आहे.आगमी काळात सूद्धा परिस्थिती अनुकूल राहिल्यास 11  ते 12 हजार रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.चार -पाच  दिवस खानदेश, मराठवाडा विदर्भ कापूसपट्टयात खुप पाऊस झाला आहे. सततच्या पावसाने कपाशीच्या बोंडात कोंब तयार झाले असून त्या कैऱ्या काळवंडून त्यांचे 100 टक्के नुकसान झाले.

हे पण पहा --  Cotton news : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी.. नवीन कापूस बाजारात पहा बाजार भाव

कापूस उत्पादनात घट

महाराष्ट्रातील मे महिन्यात कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या कापशी पिकांचे बोंडे उमलत असताना पाऊस सुरू झाला.एका झाडावर किमान पंधरा – वीस असताना आता ही बोंडे काळवंडून त्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे.बोंडील कापसाला कोंब आले असून या कपाशीची वेचनी करणे शक्य नाही.

जगभरात सध्याची स्थिती काय?

सध्या जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक स्थिती चांगली नाही.अमेरिकेसह युरोप आणि इतर मोठ्या अर्थव्यवस्था महागाईला तोंड देत आहेत. त्यामुळं गारमेंट म्हणजेच कपड्यांची मागणी कमी झाली. परिणामी कापड उद्योगाकडे मालाचा साठा वाढलाय. त्यामुळं सूत आणि कापसाला उठाव कमी दिसतोय. मात्र पुढील महिना दोन महिन्यांमध्ये ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.सणांच्या काळात कपड्यांना मागणी वाढून कापसालाही उठाव मिळेल.

पाकिस्तानमधील कापड उद्योग काय म्हणतोय ?

पाकिस्तानमध्ये सध्या कापसाची टंचाई जाणवात आहे. सिंध आणि पंजाब प्रांतीतील कापूस आवक सुरु झाली.मात्र पिकाचे नुकसान जास्त असल्याने आवक जवळपास 20 टक्क्यांपर्यंत कमी आहे.त्यामुळे कापसाचे दर तेजीत आहे.परिणामी अनेक सूतगिरण्या आणि कापड उद्योग अद्यापही बंदच आहे किंवा त्यांनी उत्पादन कमी केले आहे.

कापसाची उपलब्धता वाढल्यास दर काहीसे आटोक्यात येऊन या उद्योगांना उत्पादन सुरु करणे शक्य होईल.मात्र अमेरिकेतूनही जास्त कापूस मिळण्याची शक्यता नाही.

Leave a Comment