Sovereign Gold Bond : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना एक चांगली पाच दिवसांसाठी उपलब्ध झाली आहे.सरकारकडून सवलतीच्या दरात सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी योजना सुरू झाली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा दुसरा टप्पा आज 22 ऑगस्टपासून सुरु होत आहे.या योजनेतंर्गत ग्राहकांना 5,197 रुपये प्रति ग्रॅम दराने सोन्यात गुंतवणूक करता येणार आहे.
Sovereign Gold Bond |
Sovereign Gold Bond Scheme
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme) आणली आहे.गोल्ड बाँडच्या विक्रीचा (gold loan)हा दुसरा टप्पा आहे.या योजनेची दुसरी मालिका आज, 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे.26 ऑगस्टपर्यंत या योजनेत देशातील गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल.सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते.
भारतातच बुलियन एक्स्चेंजची(Billion Exchange) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने आयात करणे सोप्पं झालं आहे. त्याचबरोबर देशभरात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आता सोन्याचा एकच भाव (One Nation One Rate) राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेने या वर्षी 20 जून ते 24 जून दरम्यान पहिली मालिका सुरू केली होती.
Sovereign gold bond scheme
एक ग्रॅमसाठी असा राहील दर
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond) खरेदी योजनेची आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. येत्या पाच दिवस सोने खरेदी करता येणार आहे.सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने सोन्याचा दर निश्चित केला असून त्याची घोषणा केली आहे. त्यानुसार,सोन्याची किंमत 5,197 रुपये प्रति ग्रॅम जाहीर करण्यात आली आहे.गुंतवणूकदार अगदी एक ग्रॅम सोने खरेदी करुन या योजनेत सहभागी होऊ शकतो. तुम्ही या साठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यास प्रति ग्रॅम तुम्हाला 50 रुपयांची आणखी सवलत मिळू शकते.
Sovereign Gold Bond Intrest Rate
सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदीवर तुम्हाला दरवर्षी 2.50 टक्के व्याज मिळते.दर सहा महिन्यांनी व्याजाची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते. Sovereign Gold Bond चा कालावधी हा आठ वर्षांचा असणार आहे. पाच वर्षानंतर ग्राहकांना या बॉण्डमधून बाहेर पडता येईल. या सुवर्ण रोखेची मॅच्युअरिटी पीरियड आठ वर्षांचा असून लॉक इन पीरियड 5 वर्षांचा आहे.
Sovereign Gold Bond कोण खरेदी करू शकतो?
भारतीय व्यक्ती, अविभाजित हिंदू कुटुंब (HUF), न्यास, धर्मादाय संस्था सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करू शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदार एका वर्षात अधिकाधिक चार किलो सोने खरेदी करू शकतात. त्याशिवाय,ट्रस्ट अथवा संस्था एका वर्षात अधिकाधिक 20 किलोचे सुवर्ण रोखे खरेदी करू शकतात.
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना
गोल्ड बॉण्ड कुठून खरेदी करता येईल?
गुंतवणूकदारांना या ‘सार्वभौम सुवर्ण रोखे योजना स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL),सर्व सरकारी बॅंक,पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंज एनएसई आणि बीएसईच्या माध्यमातून खरेदी करता येईल.सुवर्ण रोखेचे जेवढे युनिट खरेदी कराल,त्याच्या मूल्याइतकी रक्कम तुमच्या डिमॅट अकाउंटमधून वजा करण्यात येईल.स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेच्या माध्यमातून तुम्हाला सुवर्ण रोखे खरेदी करता येणार नाही.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?