Cotton production : भारताची कापूस निर्यात सप्टेंबरमध्ये संपलेल्या 2022-23 हंगामात 15.50 लाख गाठी (प्रत्येकी 170 किलो) या विक्रमी नीचांकी पातळीवर आल्याचा अंदाज आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI), व्यापाराची सर्वोच्च संस्था, सोमवारी सांगितले.
कापूस उत्पादन आणि उपभोग समितीने (सीसीपीसी) सुरुवातीला ३० लाख गाठी कापसाची निर्यात करण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु जागतिक अर्थव्यवस्थेवर, विशेषतः चीनवर परिणाम झाल्यामुळे, निर्यातीला फटका बसला.
MCX cotton market live
दिनांक ८ ऑक्टोबर २३ रोजी आर्वी बाजारसमितीत कापसाची १०५ क्विंटल आवक झाली. कमीत कमी भाव ७३००, जास्तीत जास्त ७३५०, तर सरासरी ७३२० रुपये प्रति क्विंटल असे राहिले. दिनांक ७ ऑक्टोबर रोजी खामगाव बाजारसमितीत मध्यम स्टेपलच्या कापसाला सरासरी ६९०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता.
प्राथमिक कापूस उत्पादन अंदाज ३१० ते ३३० लाख गाठी राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मागील दोन वर्षांत देशातील सूत गिरण्यांनी आपली क्षमता २५ लाख रिळे एवढी वाढविली आहे.
सध्या १२-१५ लाख रिळे एवढी क्षमता येत्या काळात वाढणार आहे.जर हा उद्योग पूर्ण क्षमतेने चालू राहिला, तर मागणी ४०० लाख गाठींपर्यंत वाढू शकते. जरी ९० टक्के क्षमता वापरात आली तरी ३५० ते ३६० लाख गाठी लागतील. अर्थात, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक बाजारात सुताला तेवढी मागणी असणे देखील गरजेचे आहे.
Global cotton market updates
कापूस मिळण्याची चिंता कायम राहिली आहे. सुमारे १५ लाखांहून अधिक शेतकरी बाजारभावाची माहिती घेण्यासाठी थेटपणे समाज माध्यमांचा उपयोग करीत आहेत.परिणामी आपला माल बाजारात केव्हा न्यायचा आणि पुरवठा कसा आणि केव्हा रोखून ठेवायचा याबाबत जाणीव जागृती होत आहे.
एकंदरीत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी जमेची आहे.मागील वर्षात कापसाची सरासरी किंमत हमीभावापेक्षा २० टक्के अधिक राहिली आहे. या वर्षी तोच कल जरी राहिला, तरी सरासरी किंमत ८४०० ते ८५०० रुपये राहण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
कापूस उत्पादक देशांमध्येही कापूस उत्पादन घटणार आहे. याबाबत अमेरिकी कृषी खात्याचा (यूएसडीए) ऑक्टोबर महिन्याचा अहवाल लवकरच प्रसारित होईल.बाजाराच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असणार आहे.आपल्या देशात देखील खरीप प्रथम अग्रिम अनुमान लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.