Close Visit Mhshetkari

Land records : जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय!? बक्षीसपत्र कसे करायचे? एकाच क्लिकवर वाचा सर्व माहिती

Land records : भारतातील कोणत्याही व्यक्तीने स्वकष्टाने कमावलेल्या मालमत्तेवर त्याचा अधिकार असतो.अशा वेळेस तो आपल्या वारसांना किंवा वारसा पैकी एखाद्या व्यक्तीला आपली मालमत्ता स्वइच्छेने लिखित स्वरूपात बक्षीस पत्र देऊन दान करू शकतो.आपली मालमत्ता दान देण्याची इच्छा लिखित स्वरूपात लिहून देते त्यास बक्षीस पत्र संबोधले जाते.

मालमत्ता बक्षीसपत्र म्हणजे काय?

जमीन बक्षीस पत्र :- आपण आपल्या मालकी हक्काची जमीन इतर कोणास कायमस्वरूपी देतो.तेव्हा त्या जमीन व्यवहारास बक्षीसपत्र असे म्हणतात.

मुद्रांक शुल्क :- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम २०१७ नुसार महाराष्ट्र राज्य भेटवस्तू डीडच्या मालमत्तेच्या मूल्याच्या ३ % मुद्रांक शुल्क आकारत असते. आपल्या कुटुंबातील रक्तातील सदस्यांना कोणतेही पैसे न देता शेतजमीन भेट म्हणून दिल्यास मुद्रांक शुल्क २०० ₹ आहे.

बक्षीसपत्र करताना कोणती काळजी घ्यावी?

  • बक्षीसपत्रामध्ये बक्षीस देणाऱ्याचे, घेणाऱ्याचे नाव, त्या व्यक्तीचे आपल्याशी नाते आणि जमीन बक्षीस देण्याचे स्पष्ट कारण लिहिणे आवश्यक असते.
  • मालमत्ता हस्तांतराचा दस्तावेज नोंदणी करत असताना नोंदणी कायद्यानुसार लिहून देणारा व घेणारा सहदुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे.
  • बक्षीसपत्र साध्या कागदावर स्वहस्तेही करता येते. परंतु त्याला पुढे कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे स्टॅम्प पेपर लिहून देणार व लिहून घेणार यांच्या सह दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत.
हे पण पहा --  Land Record : तुमच्या जमिनीचा सातबारा बनवता आहे की खरा !कसा ओळखायचा पहा सविस्तर माहिती..

बक्षीसपत्र आवश्यक कागदपत्रे

  • NOC किंवा दोन्ही मधील नाते दर्शवणारे कागदपत्रे
  • बक्षीस पत्राची मुळ प्रत दानपत्र देणाऱ्याचे मालमत्ता मालकी हक्क दाखवणारे खरेदीखत
  • प्रॉपर्टी कार्ड
  • सात-बारा
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड

Leave a Comment