Close Visit Mhshetkari

Cotton : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गणपती ‘बाप्पा’ पावला,कापसाला मिळाला १६ हजाराचा भाव

 Cotton Prices in India : देशातील हरियाणा,पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील काही मंडईंमध्ये कापसाची नवीन आवक सुरू झाली आहे.जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली.यादिवशी कापूस विक्री  करणाऱ्या शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला.बोदवड येथे कापसाला चक्क 16 हजार रुपये असा उच्चांकी भाव (cotton rate) मिळाला.तर आज भारतात कापसाला सुरुवातीलाच विक्रमी बाजार भाव  मिळाला आहे.

Cotton crop
Cotton crop

 

Cotton Prices in India

  पांढऱ्या सोन्याचे नंदनवन असलेल्या बोदवड तालुक्यात बुधवारी कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला असून खरेदीच्या शुभ मुहूर्तावर सोळा हजाराचा भाव देण्यात आल्याने कापसाची यंदाची सुरुवात जोरदार झाली.वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला.यामध्ये 16 हजाराचा भाव मिळाला.

  धरणगाव येथे श्री जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली.मुहूर्ताचा भाव यावेळी 11 हजार 153 रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. सातगाव डोंगरी ता.पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी 14 हजार 772 रुपये भावाने कापूस खरेदी केला.पहिल्या दिवशी 67 किलो कापूस खरेदी झाला .

हे पण पहा --  Cotton rate : जागतिक बाजारात कापूस भावामध्ये वाढ ? पहा आजचे ताजे कापुस बाजार भाव 

  पहिल्याच दिवशी मुहूर्तावर साधारण एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.धरणगाव तालुक्यातील जीनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात होत असते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह जीवनसिंह बयस,माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.याशिवाय बाळद ता.पाचोरा,कासोदा ता. एरंडोल आणि कजगाव ता.भडगाव येथेही कापूस खरेदी सुरु झाली आहे.

कापूस बाजार भाव

महाराष्ट्रातील गणेश चतुर्थी च्या शुभमुहूर्तावर कापसाला मिळालेला “कापूस बाजार भाव 2022” पुढील प्रमाणे आहे.

>> धरणगाव :  11153 रुपये

>> कासोदा : 11011  रुपये

>> कजगाव : 11000 रुपये

>> बोदवड : 16000 रुपये

>> सातगाव डोंगरी  : 14772 रुपये

>> बाळद : 11551 रुपये

Cotton Market Rate

तर आज भारतात कापसाला सुरुवातीलाच विक्रमी बाजार भाव (cotton market rate) मिळाला आहे.

>>  हरियाणा भिवनी :- 9126-9550,

>> सिरसा :-  9590-9650 रूपये,

>> तामिळनाडू मुलानी :- 11381-12881 रूपये,

>> थेनी मध्ये 10,000-10200

Leave a Comment