Close Visit Mhshetkari

Old pension scheme : जुन्या पेन्शन योजनेविषयी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Old Pension Scheme : शासकीय कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनावर “जुनी पेन्शन योजना”  (OPS) लागू करण्यासाठी मोर्चा काढला होता.त्यानंतर पुन्हा एकाद जुन्या पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे.त्यातच विधान परिषद निवडणुकीत जुन्या पेन्शनचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो आहे.

Old Pension Schemes latest news

जुनी पेन्शन योजना बाबत (OPS) आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Old pension scheme new update

शिक्षण विभागाकडून जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास सुरु
सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता आहे.शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी केले आहे.महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

हे पण पहा --  Bank Holidays : दोन दिवसांचा संप! बँका अर्थसंकल्पापूर्वी चार दिवस बंद राहणार, झटपट उपकार कामे

जुनी पेन्शन योजना सुरू करायला हरकत नाही – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीआहे.जुनी पेन्शन योजना सुरू करायला काहीच हरकत नसल्याचे वक्तव्य केले आहे.प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की,आपल्याकडून जे 156 रुपये कापल्या जातात ते पैसे आज कोटींमध्ये जमा आहेत.सरकार त्याच्यावर कर्ज काढून सरकार चालवत आहे.त्यामुळे पेन्शनसाठी पैसे बजेटमधून घ्यायची गरज नसून पेन्शन साठी आवश्यक पैसा आधीपासून जमा आहे.

Leave a Comment