Close Visit Mhshetkari

MahaDBT Portal Scheme : कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर व कृषी अवजारे करिता अर्ज सुरू, तब्बल एवढी सबसिडी

MMahaDBT Portal Scheme : कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 करिता महाडिबीटी योजना शासनाने सुरू केलेली आहे.  ज्या शेतकऱ्यांनी 2022 मध्ये अर्ज केलेले असेल अशा शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. अशा शेतकऱ्यांचा अर्ज 2023 वर्षासाठी देखील गृहीत धरण्यात येणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023

महाडीबीटी पोर्टल द्वारे महाडिबीटी शेतकरी योजना अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,लागवड यंत्र, तसेच कृषी सिंचन साधने व सुविधा अंतर्गत तुषार, ठिबक, रेनगन, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांचा समावेश असतो.

MahaDBT Portal Scheme lottery

एक शेतकरी एक अर्ज’ अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी म्हणजेच एकाच MahaDBT portal अर्ज उपलब्ध करून दिले जातात.यासाठी लॉटरीचा उपयोग करून सोडत दिली जाते. आता महाडीबीटी पोर्टलवर अनुदानासाठी अर्ज केलेल्या ज्या शेतकरी बांधवांना लॉटरी लागली आहे.

Mahadbt lottery list

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर दर 10 ते 15 दिवसांनी प्राप्त झालेल्या अर्जांमधून लॉटरी  जाहीर केले जाते आणि या लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.

हे पण पहा --  MahaDBT Portal Scheme : महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कांदा चाळ व मळणी यंत्र लॉटरी जाहीर! येथे पहा संपूर्ण यादी

MahDBT आवश्यक कागदपत्रे

१. 7/12 उतारा
२. 8-अ उतारा
३. शेतकऱ्याचे हमीपत्र (विहीत नमुना सोबत परिशिष्ठ 7 मध्ये सहपत्रित केला आहे).

Mahadbt farmers scheme 2023

कृषी अधिकाऱ्याकडून अपलोड केलेले कागदपत्रे यथायोग्य असल्यास पूर्वसंमती बहाल केली जाते.पूर्वसंमती बहाल झाल्यानंतर संबंधित शेतकरी बांधवांना त्या यंत्राची खरेदी पावती GST बिलासह MahaDBT portal वर अपलोड करावी लागते.

Leave a Comment