Close Visit Mhshetkari

7th Pay Commission : मोठी बातमी..दिवाळीपूर्वीच बोनस/सणअग्रीम आणि 38% DA सह जमा होणार ऑक्टोबरचा पगार !

7th Pay Commission : मित्रांनो राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता 24 ऑक्टोबर रोजी राज्यात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबई महानगरपालिका तसेच,बेस्ट कर्मचारी आणि शिक्षक सहित आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या बोनसची घोषणा केली आहे.

महागाई भत्ता 38% होणार!

केंद्र सरकारने मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता देऊ केला आहे,केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील काही शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना 4 % वाढीव महागाई भत्ताचा लाभ दिवाळी सणापुर्वी देण्यात आला आहे.

Salary and bonus for government employees

राज्यातील विविध राज्य कर्मचाऱ्यांचा  संघटनांकडून देखील दिवाळीपूर्वी सन अग्रिम तसेच ऑक्टोबर महिन्यातील पेमेंट राज्य कर्मचाऱ्यांना दिले जावे अशा मागण्या देखील केले गेल्या आहेत.दरम्यान(Employees Diwali Bonus )अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यातील पगार (October salary) आणि सण अग्रिम किंवा बोनस दिला जाणार आहे.

दिवाळी सणाच्या तारखा बघता नागपूर वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित केले गेले आहे.तसेच राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार आणि त्यासोबतच सणअग्रिम दिवाळीपूर्वी जारी करण्यासाठी लवकरच शासन निर्णय (Gr) घेतला जाण्याची शक्यता आहे.शिंदे – फडणवीस सरकारने याआधी गणपती सिझनमध्ये असाच पगार लवकर करण्यासंदर्भात शासन निर्णय घेतला होता.दिवाळी सण 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हे पण पहा --  7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! सरकार आणखी 4 भत्ते वाढविण्याच्या तयारीत

महागाई भत्ता 38% होणार!

केंद्र सरकारने मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता देऊ केला आहे,केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना 4 % वाढीव महागाई भत्ताचा लाभ दिवाळी सणापुर्वी देण्यात यावा अशी मागणी राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडुन करण्यात आलेली आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार नागो गानार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून,राज्य कर्मचाऱ्यांना,विशेषत: राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 38 % दराने महागाई भत्ता लागु करण्यात यावा. अशी मागणी केली आहे

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22500 रुपये बोनस जाहीर

राज्य शासनाने दिवाळीआधीच मुंबई महानगर पालिका (BMC) कर्मचाऱ्यांना पगार आणि बोनस देण्याचे ठरवले असून राज्य कर्मचायांना 24 ऑक्टोबर पूर्वी महिन्याची पगार आणि बोनस द्यावी लागणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की,मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोविड -19 सारख्या परिस्थितीत चांगले काम केले आहे.तसेच त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1 thought on “7th Pay Commission : मोठी बातमी..दिवाळीपूर्वीच बोनस/सणअग्रीम आणि 38% DA सह जमा होणार ऑक्टोबरचा पगार !”

Leave a Comment