Land Record: नमस्कार आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज आपण बनावट सातबारा वर त्याच्यावर कर्ज कसे घेतले जाते.
याशिवाय जमिनीचे व्यवहार करताना बनावट सातबारा उतारा दाखवून फसवणूक केली जाते, त्यामुळे सातबारा उतार्याच्या आधारे व्यवहार करताना तो उतारा बरोबर की चूक, हे तपासणे आवश्यक असते. बनावट सातबारा कसा ओळखायचा हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
जमिनीचा बनावट सातबारा कसा ओळखावा?
1. तलाठ्याची सही
मित्रांनो सातबारा उतारा वर तलाठ्याची सही केलेली असते. तुमच्या व्यवहारामध्ये सातबारा उतारा सादर केला असेल तर त्यामध्ये तलाठ्याचे स्वाक्षरी नसेल तर असं समजून जायचे आहे की सातबारा हा बनावट आहे. तुम्हाला माहितीच असेल की सरकारने गेल्या काही वर्षात डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध करून दिली आहे.
नवीन बदलानुसार सातबारा उताऱ्यावर आर कोड दिलेला असतो. तुम्ही एखाद्या जमिनीचा व्यवहार करत असाल तर आणि त्या जमिनी उताऱ्या वरती तुम्हाला आर कोड दिसत नसेल तर सातबारा बोगस आहे असे सिद्ध होते
2 LED कोड व महाभुमी प्रकल्पाचा लोगो
आजकालच्या युगामध्ये फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे सातबारा उताऱ्यावर सातत्याने बदल करण्यात येत असून आत्ताच्या सातबारा उतारावरील नवीन बदलानुसार सातबारा उतारा शेतजमिनीच्या माहिती सोबतच गावचा आणि कोड क्रमांक त्यामध्ये नमूद करण्यात आला आहे
सरकारच्या या नवीन नियमानुसार ज्या सातबारा उताऱ्यावर हा कोड नसेल तो सातबारा बनावट आहे असे सिद्ध होते यामुळे तुम्ही हा कोड देखील लक्षपूर्वक चेक करायचा आहे.
मित्रांनो तुमच्या माहिती करता हे दोन लोगो प्रत्येक डिजिटल सातबारा वरती असतात,परंतु तुमचा डिजिटल सातबारा उताऱ्याच्या प्रिंट आऊट मध्ये हे दोन लोगो नसेल तर तो सातबारा बोगस आहे असे सिद्ध होते.