Close Visit Mhshetkari

Whatsapp Feature : मोठी बातमी व्हॉट्सॲप कडून नवीन फीचर लॉन्च; आता ग्राहकांना कॉलींग सह मिळणार ‘ या ‘ सुविधा …

Whatsapp Feature : व्हॉट्सॲपने युझर्सच्या सोयींसाठी खास फीचर आणले आहे.आता युझर्सला कॉलिंगसाठी फोन नंबर सेव्ह करण्याची गरज भासणार नाही. ग्राहकांना आता फोन नंबर टाकल्यास व्हॉट्सॲप कॉलिंग करता येणार आहे. तर हे फीचर कधी येणार ? वैशिष्ट्ये काय पाहूया सविस्तर …

Special Feature Of Whatsapp

व्हॉट्सॲपचे नवीन फीचर विकसीत झाले असून युझरला त्यांच्या व्हॉट्सॲप डायलरच्या माध्यमातून व्हाईस कॉलची सुविधा होणार आहे.नवीन व्हॉट्सॲप फीचर अजून पर्यंत Google Play बीटा प्रोगामवर वापरकर्त्यांसाठी अजून उपलब्ध करून देण्यात आले नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार, हे फीचर त्या युझर्सला एकदम उपयोगी पडेल, ज्यांच्याकडे समोरील व्यक्तीचा क्रमांक सेव्ह नसताना डायलरवरुन मोबाईल क्रमांक डायल करुन व्हॉट्सॲप कॉल करता येणार आहे.

WABetainfo कडून व्हॉट्सॲप बीटा आवृत्ती 2.24.9.28 आणली जात आहे.नवीन डायलर फीचर अँड्राईड मोबाईलसाठी आले आहे. सध्या या फीचरवर काम सुरु असून अपडेट करण्याचे काम सुरु आहे.सदरील फीचर आल्यावर व्हॉट्सॲप केवळ एक मॅसेजिंग प्लॅटफॉर्म राहणार नाही.थोडक्यात WhatsApp एक मल्टि फंक्शनल कॉलिंग सेवा देणारे ॲप ठरणार आहे.

हे पण पहा --  WhatsApp update : मोठी बातमी ... एकाच फोनमध्ये वापरा दोन व्हॉट्सअप ; अशी करा सेटिंग...

WhatsApp Dialler Pad

डायलर पॅडचा समावेश करण्यामागे कंपनीचा उद्देश तरी काय ? असा प्रश्न तज्ज्ञांना पडतो आहे.कंपनीने याविषयीचे कारण अजून स्पष्ट केले नसले तरीही काही फीचर समोर आले आहेत.

  • युझर्सला काँन्टक्ट सेव्ह न करता चॅटिंग करणे सोपे
  • अनोळखी व्यक्तींना गरजेच्या वेळी कॉल करता येणार
  • ऑफिशिअल अथवा अभ्यासाविषयी अभ्यासक्रमाविषयीची मीटिंग घेता येणार 
  • वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी कॉल करणे सोपे होईल
  • एखाद्या अपाईंटमेंटसाठी त्याचा वापर करता येईल

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment