Voting ID : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की राज्यसह देशभरात लोकसभेचे बिगुल वाजलेले असून सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेले आहेत. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात लोकसभा सार्वजनिक निवडणुका होणार असून 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे.
मित्रांनो आपल्याला माहिती असेलच की, मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात येते,असे असले तरी भारत निवडणूक आयोगाने मतदान कार्डाशिवाय इतर 12 ओळखीचे पुरावे मतदान करण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकले नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
मतदानासाठी स्वीकार्य ओळखपत्र
मतदानावेळी मतदारांना निवडणूक ओळखपत्रासह खालील 12 पुराव्यांपैकी एक दाखवणे आवश्यक आहे.
1. पारपत्र (पासपोर्ट)
2. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
3. केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
4. बँक/टपाल विभागाकडून दिलेले छायाचित्र असलेले पासबुक
5. पॅन कार्ड
6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
7. मनरेगा अंतर्गत निर्गमित रोजगार ओळखपत्र**
8. निवृत्तीवेतनाची दस्तावेज
9. संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
10. आधार कार्ड
11. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाद्वारे दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
12. कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
Voter ID Card Update
एखादा मतदाराने आपल्या मतदार यादीतील पत्त्यात बदल केला असेल परंतु अद्याप ओळखपत्र मिळाले नसेल, तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. परंतु त्या मतदाराचे नवीन ठिकाणी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाकडून सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान 5 दिवस आधी मतदान केंद्र,यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे वितरण केले जाणार आहे.
मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाताना माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन जावे,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.