Close Visit Mhshetkari

Voter ID Card : मतदार यादीत आपले नाव आहे का ? चुकीचे असल्यास मतदान ओळखपत्र घरबसल्या कसे करायचे अपडेट? पहा सोपी पद्धत …

Voter ID Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणूक 2024 भिजून वाजलेला आहे. साधारणपणे सात टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या भागात निवडणूक पार पडणार आहे.

राजकीय पक्षांबरोबरच मतदारांची सुद्धा लगबग सुरू झालेली आपल्याला दिसत आहे. पण यासाठी आपले मतदान यादीत नाव आहे का ? नसल्यास कसे ॲड करायचे ? चुकीचे असल्यास ते कसे दुरुस्त करायचे ? या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Voter ID Card Update

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण शिक्षण नोकरी लग्न किंवा व्यवसायासाठी आपल्या मूळ गावावरून दुसऱ्या शहरात स्थलांतरित झालेलो असतो.अशावेळी आपल्या मतदान यादी मधील नावामध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात.

आपण राहत असलेल्या ठिकाणी आपल्याला आपला मतदान हक्क बजावायच्या असल्यास मतदान कार्ड पत्ता कसा बदलायचा यासंदर्भात वेगवेगळ्या अडचणी आपल्याला येत असतात.

आता आपले मतदान ओळखपत्र आपल्याला घरबसल्या सुद्धा अपडेट करता येते. ही आहे अत्यंत सोपी पद्धत

How to Search Name in Voter list

सर्वात अगोदर तुमचा फोन वा लॅपटॉपच्या मदतीने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जा. याठिकाणी एक नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. Search by Details, Search by EPIC and Search by Mobile या आधारे तुम्ही नाव तपासू शकता.

हे पण पहा --  Voter list Download : अशी डाऊनलोड करा आपल्या गावची ग्रामपंचायत मतदार यादी मोबाईलवर 2 मिनिटात, पहा यादीत आपले नाव

Voter ID Card Online Update 

  • सर्वात अगोदर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर www.nvsp.in जावा.
  • निवडणूक आयोगाच्या या होमपेजवर सर्वात अखेरीस तुम्हाला मतदान ओळखपत्र अपडेट करण्याचा पर्याय मिळेतो.त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर अर्ज 8 (Form 8) उघडेल
  • येथे तुमचे नाव, जन्मतारीख, राज्य, विधानसभा मतदार संघ, नवीन स्थानिक पत्ता याची नोंद करा.
  • तुमचा ई-मेल एड्रेस, मोबाईल क्रमांक टाका.
  • त्यानंतर तुमचे छायाचित्र, मुळ आयडी, एड्रेस प्रुफ कागदपत्रे अपलोड करा
  • आता कॅप्चा नोंदवा आणि डिक्लेरेशन पर्याय भरा
  • तुम्ही नोंदवलेली माहिती एकदा तपासा आणि सबमिट बटणावर क्लिक करावे.
  • वोटर आयडी अपडेट करण्यासाठी तुमचा अर्ज आता जमा केला जातो.
  • तुमचे मतदान ओळखपत्र अपडेट झाल्यानंतर यासंबंधीचा ई-मेल तुम्हाला प्राप्त होईल.
Documets for Voter ID Update 

खालील कागदपत्रे तुम्हाला PDF किंवा JPG फॉर्मेटमध्ये कन्व्हर्ट करुन घ्यावी लागतील.ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान अपलोड करावी लागतील.

  • पासपोर्ट आकाराची 2 फोटो
  • पत्ता विषद करणारी कागदपत्रे
  • बँक पासबुकची कॉपी
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • ITR प्रूफ
  • भाडे करारनामा
  • वीज, पाणी, टेलिफोन, गॅसचे बिल
  • वयाचा दाखला
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment