Close Visit Mhshetkari

UPI Payment Mistakes : तुमच्याकडून जर चुकीच्या फोन नंबर वर UPI ने पैसे पाठवले तर परत कसे मिळवायचे? घ्या जाणून सविस्तर माहिती

UPI Payment Mistakes : नमस्कार मित्रांनो डिजिटल युगामध्ये नकळत अशा घटना घडत असतात. आणि घडल्यानंतर त्यावर काय उपाययोजना करायची याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. एखाद्या व्यक्तीकडून नकळत दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जर गेले तर ते परत कसे मिळवायचे किंवा त्या व्यक्तीने नंबर बदललेला असतो. आणि तो नंबर इतर अकाउंट तर कोणाच्याही अकाउंटला लिंक केलेला असतो अशा वेळेस कशी खबरदारी घ्यायची हे आपण सविस्तर पाहूयात.

UPI Payment Mistakes To Avoid

युपीआय पेमेंट हे डिजिटल युगातील एक वरदान समजले जाते याद्वारे तुम्ही अगदी कुठेही कॅशलेस व्यवहार करू शकता आपल्या वाढलेला खर्च मोबाईलवर वाढलेले हे सगळे त्रास तर समोर आहेतच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे चुकून जर तुमच्याकडून दुसऱ्यांच्या नंबर वर किंवा अकाउंटला पैसे पाठवले गेले तर अलीकडे अलीकडे तर किंवा कोड स्कॅन करून पेमेंट करता येते. पण तरीसुद्धा तुम्हाला एखाद्या मोबाईल नंबर ला पेमेंट करायचं असतं तेव्हा चुकून दुसऱ्याच्या नंबरला पैसे जातात ही मोठी चूक होण्याची दाट शक्यता असते.

चुकून जर दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे गेले आणि त्या नंबर वर व्यवहार झाला. अशा परिस्थितीमध्ये आपले पैसे परत कसे मिळवता येतील याविषयी सविस्तर माहिती पहा.

चुकीच्या फोन नंबरला UPI ने पैसे पाठवल्यास परत कसे मिळतील?

सर्वात प्रथम तुम्हाला चुकीच्या व्यक्तीकडे पैसे गेले ते मिळवण्याकरिता पैसे हे अनावधाने ट्रान्सफर झाले आहे. असे सिद्ध करावे लागेल. ते जर सिद्ध झाले तर पुढील जबाबदारी ही बँकेची राहते इकॉनोमिकल लॉ प्रॅक्टिस या संस्थेचे भागीदार अभयचो उपाध्याय यांच्या हवाल्याने टाईम दिलेल्या माहितीनुसार चुकीच्या प्राप्तकर्त्याकडे पैसे ट्रान्सफर झाल्यास व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर पुरावा सादर वापरकर्त्याकडे बँकेसमोर सादर करणे आवश्यक राहते.

हे पण पहा --  UPI Payment : युपीआयसाठी द्यावे लागणार शुल्क! या लोकांना मोजावी लागेल मोठी रक्कम ...

चट्टोपाध्याय यांनी असेही नमूद केले की रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल योजना 2019 च्या नियमन 8 नुसार जर एखादी बँक आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी झाली तर चुकीच्या प्राप्तकर्त्याला हस्तांतरित केलेले पैसे न दिल्याने बँकेविरुद्ध तक्रार करता येते .

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेतील सीओओ श्रीजीथ मेनन यांनी टाइम्सला सांगितले की, तुम्ही जितक्या लवकर बँकेकडे किंवा बँकेच्या विरुद्ध तक्रार कराल तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते.

लवकरात लवकर संपर्क साधायला पाहिजे आणि बँकेकडे तुमच्या व्यवहाराची तपशील व संबंधित बँक अकाउंट नंबर शेअर करावे लागते ज्या व्यक्तीकडे चुकून पैसे गेले आहे. त्यांच्या कडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो.

UPI payment online complaint

  1. UPIवापरून  चुकीचा व्यवहार झाला , तर एखादी व्यक्ती तक्रार नोंदवण्यासाठी NPCI च्या विवाद निवारण यंत्रणेची मदत मिळू शकते.
  2. स्टेप 1: https://www.npci.org.in/what-we-do/upi/dispute-redressal-mechanism इथे भेट द्या.
  3. स्टेप 2: ‘Complaint’ नावाच्या बॉक्सवर जा.
  4. नंतर ड्रॉप-डाउन मेनूमधून व्यवहाराचे स्वरूप निवडा.
  5. त्यानंतर समस्या निवडा.
  6. व्यक्तीने UPI ॲपवर तक्रार करावी.
  7. जर एखाद्या व्यक्तीच्या तक्रारीचे उत्तर मिळाले नाही तर पुढील टप्प्यावर बॅक एंड (PSP) आणि NPCI व्यवहार हाताळणाऱ्या बँकेकडे तक्रार दाखल करता येते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment