Sukanya Samriddhi Yojana : नमस्कार मित्रांनो पालक आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. त्यांच्या भविष्याविषयी काळजी वाटत असताना प्रत्येक पालक आपल्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी तसेच लग्न करिता गुंतवणूक करत असतात. सुकन्या समृद्धी योजना यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला किती फायदा होईल ? त्याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Sukanya Samriddhi Scheme Benefits
मित्रांनो आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 250 रुपयापासून ते अडीच लाख रुपये जमा करता येतात. जर आपल्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असेल तर, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावरती सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता इतक्या लवकर आपण गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुमच्या मुलीसाठी फंड तयार करता येऊ शकतो.
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत आपण जर पाचशे रुपये ते दीड लाख रुपये जमा केले तर , मॅच्युरिटी नंतर किती रुपये मिळतील, याची उदाहरण आपण खाली पाहणार आहोत तत्पुरे मित्रांना आपल्याला हे माहिती हवे की, या योजनेत पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते आणि ती 21 वर्षात मॅच्युअर होते.
Suknya Samrudhhi Calculator
सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी मुलीच्या नावावर 1.5 लाख जमा केले तर तुम्हाला दरमहा 12,500 रुपये गुंतवणुक करावी लागेल म्हणजे 15 वर्षात एकूण 22 लाख 50 हजारांची गुंतवणूक कराल. सध्या या योजनेवर 8.20 % व्याज दर आहे.
21 वर्षांच्या मॅच्युरिटी वेळी एकूण 46 लाख 77 हजार 578 रुपये व्याजाचे स्वरूपात मिळतील आणि मॅच्युरिटीवर मुलीला एकूण 22,50,000 रुपये 46,77,578 = रुपये 69,27,578 (सुमारे 70 लाख रुपये) मिळतील.
आपण जर 2024 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर 2045 मध्ये मॅच्युअर होईल. योजनेचे संपूर्ण पैसे 2045 पर्यंत मिळतील.
सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार आयकर कायदा,1961 च्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकतात.सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत उघडता येते.