Secured Credit Card:- मित्रांनो क्रेडिट स्कोर हा कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असतो. ज्यावेळी आपल्याला बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवायचे असते .तेव्हा क्रेडिट स्कोर महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. तुमचा जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज मिळण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
तुम्हाला सांगायची झाल्यास बऱ्याच वेळा असे होते आपण अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थित रित्या केली नाही तर व क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरली नाही तर आपला क्रेडिट स्कोर घसरतो व त्यामुळे आपल्याला क्रेडिट कार्ड व बँकेकडून कर्ज मिळवणे अवघड जाते.
तुम्हाला जर क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर घसरलेला जर असेल. तर ह्या कारणामुळे तुम्हाला बँक क्रेडिट कार्ड देत नसते. याकरिता तुम्हाला सुरक्षित क्रेडिट कार्डचा पर्याय चांगला ठरतो मग सुरक्षित क्रेडिट कार्ड काय आहे. याची सविस्तर माहिती आपण ह्यालिकामध्ये पाहूयात
नेमके सुरक्षित क्रेडिट कार्ड काय आहे?
मित्रांनो तुम्हाला जर सुरक्षित क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर तुम्हाला बँक मध्ये मुदत ठेव रक्कम जमा करणे आवश्यक आहे. कारण कमी क्रेडिट स्कोर असल्यामुळे बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड व कर्ज देत नाही.
आणि तुम्ही जर काही रक्कम बँकेत जमा केली तर सिक्युरिटी पद्धतीने क्रेडिट कार्ड बँकेच्या माध्यमातून तुम्हाला मिळते आणि या कार्डचा वापर तुम्ही इतर क्रेडिट कार्ड सारखा करू शकता.
तुम्हाला हे क्रेडिट कार्ड वापरण्याचा सर्वात मोठा फायदा सांगायचा म्हणजे तुमचा जर क्रेडिट स्कोर खराब जरी असला तर तो सुधारण्याकरिता याचा फायदा होतो.
कालांतराने तुमचे हे सुरक्षित क्रेडिट कार्ड सामान्य क्रेडिट कार्ड म्हणजेच असुरक्षित क्रेडिट कार्ड होऊ शकते व तुमची क्रेडिटची लिमिट देखील वाढू शकते.
काही वेळानंतर तुमचे सुरक्षित क्रेडिट कार्ड सामान्य क्रेडिट कार्ड म्हणजेच सुरक्षित क्रेडिट कार्ड बनेल तुमची क्रेडिट ची लिमिट सुद्धा वाढू शकते.
सुरक्षित क्रेडिट कार्ड वरचा लिमिट कसा ठरतो?
मी जर सुरक्षित क्रेडिट कार्ड ची लिमिट जर बघितली तर तुम्ही जी काही रक्कम बँकेमध्ये जमा केलेली असते त्या मूल्याच्या आधार आधारित व त्याच्या बरोबरीत त्याची लिमिट तुम्हाला या कार्डवर दिली जाते .
तुम्हाला ज्यावेळी हे कार्ड दिले जाते. त्यावेळेस बँकेच्या माध्यमातून तुमचा क्रेडिट स्कोर तपासात नाही. तुम्ही जर क्रेडिट कार्ड पहिल्यांदा अर्ज जर केला असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब असला तरी तुम्हाला सुरक्षित क्रेडिट कार्ड बँकेकडून दिले जाते. व याचा वापर तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारण्याकरिता करू शकता.
तुमच्या क्रेडिट स्कोर वर याचा विपरीत परिणाम म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो हे क्रेडिट कार्ड सामान्य क्रेडिट कार्ड पेक्षा थोडे महागच ते कारण यामध्ये तुम्हाला सुरक्षा प्रदान केलेली असते.
तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा याचा म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर किंवा तुमचा इतिहास न पाहता हे कार्ड तुम्हाला सहजरित्या बँकेकडून दिले जाते तसेच सामान्य क्रेडिट कार्ड प्रमाणे तुम्हाला रिवार्ड पॉईंटचा फायदा देखील देण्यात येतो.
यामध्ये तुम्हाला अतिरिक्त कालावधीचा लाभ देखील मिळतो हे कार्ड तुम्हाला बँक ऑफ बडोदा तसेच एसबीआय ॲक्सिस बँक इत्यादी कडून दिले जाते.