Close Visit Mhshetkari

Scholarship For Girls : सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना! पहा या योजनेचे स्वरूप …

Scholarship For Girls : नमस्कार मित्रांनो राज्यांमध्ये असलेल्या शाळा व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या भटक्या जमाती तसेच विमुक्त जाती व विशेष मागासवर्गीय वर्गाच्या मुलींकरता सरकारने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू केली. असून ही योजना सामाजिक न्याय सहाय्य विभागाकडून राबवली जात आहे.

ही योजना कधी सुरू करण्यात आली 

मित्रांनो ही योजना इयत्ता पाचवी व सातवी साठी साधारणपणे 1996 तर आठवी ते दहावी करिता 2003 पासून ही योजना लागू करण्यात आली. असून सावित्रीबाई फुले या शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुण किंवा उत्पन्न याची कोणत्याही प्रकारची अट नाही. मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ वर्षातून तीन टप्प्यांमध्ये देण्यात येतो.

मुलींच्या सक्षम भविष्यासाठी त्यांना शिक्षण मिळवून देणे या योजनेचा हेतू आहे. जर आपण ग्रामीण व शहरी भागाचा विचार करता आपल्याला ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाचे गतीचे प्रमाण दिसून येते.

सरकारने या गळतीचे प्रमाण थांबवण्याकरता प्राथमिक शाळा व शैक्षणिक संस्था शिकत असलेल्या तसेच भटक्या जमातीतील व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील मुलीं करता सरकारच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली .असून ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

हे पण पहा --  Girls Scholarship : आता मुलींनाना मिळणार 1000 रुपये शिष्यवृत्ती!

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ 

राज्यामध्ये असलेल्या प्राथमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या भटक्या जमाती तसेच विमुक्त जाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींकरिता सरकारच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली असून ही योजना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे.

इयत्ता पाचवी व सातवी साठी साधारणपणे 1996 तर आठवी ते दहावी करिता 2003 पासून ही योजना लागू करण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुण किंवा उत्पन्न यांची अट नाही. मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ वर्षातून तीन टप्प्यात देण्यात येतो.

या योजनेअंतर्गत किती मिळतो लाभ?

या या योजनेच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते सातवी मधील मागास वर्गातील विद्यार्थींना प्रत्येक महिना 250 रुपये प्रमाणे दहा महिन्यांकरिता अडीच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.

तसेच मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 300 रुपये दहा महिन्यांकरिता 3000 रुपयाची शिष्यवृत्ती मिळते या योजनेच्या शिष्यवृत्तीचे दर अजून पर्यंत कमी असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. दर वाढण्याचा विचार शासन करत आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment