Retired Employees : नमस्कार मित्रांनो,सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्तिवेतन व अन्य लाभ वेळेत मिळावे यासाठी राज्य शासनाने राज्य पातळीवर सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्याचे ठरवले आहे.यासंदर्भात शासन निर्णय २२ मे रोजी वित्त विभागाने निर्गमित केला आहे.
Employees Pension Disbursement Online System
आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती नंतर निवृत्ती वेतन व इतर महत्त्वाची लाभ मिळण्यासाठी बराच वेळा विलंब होतो उतार वयात कर्मचाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा सदरील बाब लक्षात घेऊन सरकारने आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन व त्या अनुषंगाने इतर महत्त्वाच्या लाभाच्या संदर्भात नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्तिवेतन व अन्य लाभ वेळेत मिळावे यासाठी राज्य शासनाने राज्य पातळीवर सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे ठरवले आहे. मित्रांनो १ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाड्यात व त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात सदरील प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.
ई-पीपीओ, ई-जीपीओ आणि ई-सीपीओ असे या नव्या ऑनलाईन प्रणालीचे नाव असून ती पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय-२ नागपूर या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव अशा 8 जिल्ह्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अशा एकूण १९ जिल्ह्यांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यात महालेखापाल मुंबई कार्यालयाच्या कार्यकक्षेतील १५ जिल्ह्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे.
सदरील प्रणाली महालेखापाल नागपूर कार्यालयाच्या कार्यकक्षेतील १९ जिल्हा कोषागार कार्यालयांसाठी १ ऑक्टोबरपासून तर महालेखापाल कार्यालय मुंबईच्या कार्यकक्षेत असलेल्या १५ जिल्ह्यांसाठी १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
निवृत्ती वेतन विलंबामुळे मनस्ताप
सध्या सरकारी कर्मचारी अधिकारी,अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निवृत्तीवेतनाची प्रकरणे कार्यालय प्रमुखांमार्फत महालेखापाल कार्यालयाकडे पाठवली जातात.सर्व कागदपत्रांची तपासणी करून त्याला मंजुरी प्रदान केली जाऊन प्रतिलिपी संधिक कार्यालय प्रमुखांसह निवृत्त कर्मचारी आणि जिल्हा कोषागार कार्यालयाला टपालाने पाठवली जाते.
सदरील मंजुरी मिळाल्यावर कोषागार कार्यालय पुढची कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन व अंशराशी प्रदान करते.सर्व प्रक्रिया मानवी हस्ते केली जाते परणामी यासाठी बरेचदा विलंब होतो.
सदरील बाब टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व त्या अनुषंगाने मिळणारी रक्कम वेळेत मिळावी व प्रक्रियेत अचूकता यावी यासाठी लेखा कोषागार संचालनालय (मुंबई) यांच्यामार्फत वरील ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे.