Close Visit Mhshetkari

Provident Funds : पीएफचे पुढचे पाऊल, आता आर्थिक तंगी होणार दूर, कर्मचाऱ्यांना काढता येणार दुप्पट पैसे ….

Provident Funds : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात भविष्य निर्वाह संघटनेने अतिशय निर्णय घेतलेला आहे.भविष्य निधी संघटनाने (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आणली आहे.सध्या संघटनेकडे 27 कोटींहून अधिक सदस्य आहेत.

EPFO Ammount Withdrawal Rules

कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. आता कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासंदर्भात सुलभता आणण्या निर्णय घेतला आहे. परिणामी सदस्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागणार नाहीत.

कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFO ने pf खातेदारांच्या डोक्यावरील एक मोठी चिंता दूर केली आहे. पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नुकतंच पेन्शन पण बॉडीने खातेदारांच्या उपचारांसाठी रक्कम काढण्याची मर्यादा वाढवलेली आहे.

आतापर्यंत खातेदारांना त्यांच्या पीएफ खात्यातून पन्नास हजार रुपयाची रक्कम काढता येत असे आता ही मर्यादा एक लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

16 एप्रिलपासून नवीन नियम लागू

मित्रांनो,कर्मचाऱ्यांना नियम 68J अंतर्गत PF Account Holder ला गंभीर आजारात वा अत्यंत कठिण काळात मोठ्या रक्कमेची आवश्यकता असताना पीएफ खात्यातून रक्कम काढता येते.ईपीएफओने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून उपचारासाठी पैसे काढण्याचा नियम बदललेला आहे.

हे पण पहा --  PF Account Balance : आपले पीएफ बॅलेन्स दोन मिनिटात मोबाईल वर चेक करा

साधारणपणे बुधवार 16 एप्रिल 2024 पासून सदरील नियम लागू करण्यात आलेले आहे भविष्य निर्वाण संघटनेने 10 एप्रिल रोजी च्या त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये संबंधित बदल केलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता एक लाखापर्यंत रुपये आपल्या आरोग्याच्या उपचारासाठी काढता येणार आहे. ईपीएफओने सेंट्रल प्रोव्हिडंट फंड कमिशनरकडून मान्यता मिळताच, हा बदल करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सदर मिळवण्यासाठी अर्ज करून रक्कम उपचारासाठी प्राप्त होते.त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता मदतीसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाही अथवा कर्ज काढण्याची वेळ येणार नाही.

How to withdrawal PF Amount

  • सर्वप्रथम ईपीएफओचे संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर लॉगिन करावे.
  • त्यानंतर Online Services हा पर्याय निवडा.संबंधित क्लेम फॉर्म भरावा.
  • आता PF Account चे शेवटचे 4 क्रमांक टाका, पडताळणी करून Proceed For Online Claim वर क्लिक करा. 
  • आता फॉर्म 31 भरून तुमच्या खात्याची सविस्तर माहिती तपासा, पासबुकची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
  • आता Get Aadhaar OTP वर क्लिक करून सबमिट करा.

Leave a Comment