Close Visit Mhshetkari

Property Rights : दत्तक मुलाला संपत्तीत अधिकार मिळतो का ? कायदा काय सांगतो; पहा सविस्तर…

Property Rights : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कायद्यानुसार मुलांना व मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार दिला आहे. जेवढा मुलाला आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार आहे. तेवढाच मुलीला सुद्धा असतो. म्हणजेच भावाप्रमाणे मुलीला आपल्या आई वडिलांच्या संपत्ती मध्ये अधिकार मिळतो.

ज्यावेळी मूल जन्माला येते त्याचवेळी त्याच्या आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तो वारस म्हणून बनतो. परंतु काही अपवादात्मक उदाहरण असतात की काही लोकांना मूल होत नाही. अशावेळी ते दत्तक मुल घेतात अशा परिस्थितीमध्ये दत्तक मुलाला संपत्तीमध्ये किती अधिकार मिळतो? असा प्रश्न अनेकांना पडतो आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Property rights for Adoptive child

  1.  हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार, कुटुंबातील मुलांप्रमाणेच दत्तक घेतलेल्या मुलाला देखील संपत्तीत अधिकार असतो.
  2. हिंदू उत्तर अधिकारी कायदा हा हिंदू बौद्ध शीख व जैन धर्माच्या लोकांना लागू होतो. यात मुलगा व मुलगी दोघांनाही संपत्तीमध्ये अधिकार समान असतो.
  3. मित्रांनो जन्म झालेल्या मुलाला किंवा मुलीला समान अधिकार मिळत असतो असे नाही. तर एखाद्या कुटुंबांनी जर एखादं मूल दत्तक घेतले तर त्याला देखील समान अधिकार दिले जातात.
  4. ज्यावेळी मूल दत्तक घेण्याची काहीतरी प्रक्रिया पूर्ण होते त्यावेळी दत्तक मुल मालमत्तेचा कायदेशीर वारस बनतो.
  5. आई-वडिलांनी मालमत्तेवर पोटी जन्म घेतलेल्या मुलांप्रमाणेच दत्तक मुलाला देखील समान अधिकार आहे.
  6. अनेकांच्या माध्यमातून दत्तक मुलाच्या जन्मदात्या कुटुंबाच्या संपत्तीतही त्याला अधिकार मिळू शकतो का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
हे पण पहा --  Proparty Registry : मुलाला वडिलांकडून प्रॉपर्टी हस्तांतरणावर किती मुद्रांक शुल्क आकारले जाते ? पहा सविस्तर माहिती .

जन्मदात्या कुटुंबांमधून संपत्तीचा अधिकार मिळतो का ?

मित्रांनो तुम्हाला जरासा प्रश्न पडला असेल की दत्तक मुलाला त्याच्या जन्मदात्या कुटुंबांमधून संपत्तीचा अधिकार मिळतो का? 

तुम्हाला सांगायचे झाल्यास अशा, दत्तक मुलाला त्याच्या मूळ परिवाराच्या संपत्ती तेव्हाच अधिकार मिळू शकतो. त्याच्या कुटुंब मूळ कुटुंबाने जन्मदात्या कुटुंबाने इच्छा पत्र तयार केलेले असेल आणि त्यामध्ये त्याचे नाव असेल तर त्याला त्या संपत्तीमध्ये सुद्धा अधिकार मिळू शकतो.

Leave a Comment