Close Visit Mhshetkari

MP land Record: आता आपल्या जमिनीची अशी करा ई – मोजणी ! GPS प्रणालीचा होणार वापर ….

MP land Record : नमस्कार मित्रांनो आता जमीन मोजणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समिती प्रत मिळणार आहे तर ही मोजणी संगणक प्रणाली द्वारे करण्यात येणार असून काय आहे सविस्तर पाहूया.

आता जमीनची होणार ई- मोजणी 

सदरील जमीन मोजणी अक्षांश रेखांश प्रत मिळण्यासाठी आपल्याला भूमि अभिलेख कार्याकडून जमिनीची हद्द निश्चित करणे फोटो समानीकरण बिगर शेती कर्ज खोट वाटप इत्यादी प्रकरण ची मोजणी करणे सोपे होणार आहे.

मित्रांनो सदरील मोजणी झाल्यानंतर अर्जदाराला जमिनीचा मोजणी नकाशा क प्रति मध्ये जागेवर प्रत्यक्ष मोजणी वेळी वहिवाटी किंवा ताब्याप्रमाणे अभिलेखा प्रमाणे हद्द दर्शवून योग्य परिणामात संबंधित टिपा नमूद करून नकाशाची प्रत पुरवली जाणार आहे.

सदरील मोजणी प्रकारात नकाशाच्या करोडपती मध्ये जागेवर प्रत्यक्ष व मोजणी वेळी वय वाटेवर ताबाप्रमाणे अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हद्दी दर्शवून योग्य परिमाणात संबधित टिपा नमूद मोजणी नकाशाची ‘क’ प्रत पुरविली जाते.

ई-मोजणी कसे कार्य करणार ?

भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीसाठी ‘ई-मोजणी‘ ही संगणक प्रणाली अद्ययावत केली असून आता ई-मोजणी २.० ही नवीन प्रणाली आणली आहे. त्यानुसार मोजणी प्रकरणांमध्ये जमीन मोजणीसाठी जीआयएस आधारीत रोव्हर्स मशीन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी करण्यात येते. 

हे पण पहा --  Land records : जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय!? बक्षीसपत्र कसे करायचे? एकाच क्लिकवर वाचा सर्व माहिती

सदरील मोजणी नकाशावर अक्षांक्ष, रेखांश (कोर्डिनेट्स) असलेली जमीन मोजणीची ‘क’ प्रत उपलब्ध करून देण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे जमीन मोजणीनंतरही हद्दीवरून होणारे वाद उद्भवणार नाहीत.

सद्य:स्थितीत जमीन मोजणीसाठी जी.आय.एस आधारीत रोव्हर्स व इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशीन आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच मूळ भूमापन नकाशांचे डिजिटायझेशन व जिओ रेफरन्ससिंग केलेल्या नकाशांचा वापर केला जात आहे. असे नकाशेच मोजणी नकाशा अंतिम करताना आधार नकाशा म्हणून वापर करण्यात येत आहे.

मित्रांनो सदरील मोजणी 2.0 संगणक प्रणाली सद्यस्थितीत नंदुरबार वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच इतर जिल्ह्यातील एका तालुक्यात लागू करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली जाईल याबाबतचे आदेश महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर यांनी प्रसृत केले आहेत.

ई मोजणी २.० या संगणक प्रणालीदवारे स्वीकारण्यात येणारे मोजणी अर्ज gps आधारीत रोव्हर्सद्वारे मोजणी करण्यात येत असून त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत.

सदरील मोजणी प्रकारामुळे आपल्याला शेजारच्या जमीन धारकांचे हद्ददीबाबत मोजणी मिळेल मानवी चुका मुळे होणारे वाद, एकमेकांच्या हद्दी जाणे किंवा दोन मोजणीमुळे हद्दीमध्ये अंतर पडणे यासारखे वाद, तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment