Inactive Bank Account : रिझर्व बँकेने खाते चालू ठेवण्यासाठी काही नियम व कायदे केले आहे या नियम व कायद्यानुसार खात्यातून पैसे काढले जात असतात व जमा पण केले जाते, त्याच्या खात्यातील जमा रक्कम एखाद्या खातेदाराने 10 वर्षांपर्यंत त्याच्या खात्यातून कोणताही व्यवहार केला नाही.
बँक त्या खात्याला “निष्क्रिय” (dormant) मानते आणि त्यात जमा केलेली रक्कम “दावा न केलेली रक्कम” (unclaimed amount) म्हणून वर्गीकृत करते.
अकाउंट निष्क्रिय कधी होते?
जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या खात्यातून सलग 2 वर्षे कोणताही व्यवहार केला नाही तर त्याचे खाते निष्क्रिय होते. हे खाते कोणत्याही प्रकारचे असू शकते, जसे की FD, RD, चालू खाते, बचत खाते. कोणत्याही प्रकारचे खाते असल्यास, वर्षानुवर्षे कोणताही व्यवहार नसल्यास त्यात जमा केलेली रक्कम दावा न केलेली रक्कम म्हणून घोषित केली जाते.
निष्क्रिय खात्यावर जमा केलेल्या पैशावर तुम्ही दवा करू शकता का बऱ्याच वेळा असे पाहिले जाते की बहुतेक खाती मरण पावलेल्या खातेदाराची आहे आणि नंतर त्याची कुटुंब या पैशावर दावा करत असतात अशा खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव नोंदणीकृत असल्यास कोणीही सहजपणे त्या पैशावर दावा करू शकते
नॉमिनी नसल्यास काय करावे
कोणी नॉमिनी नसेल तर अशावेळी उत्तराधिकारी प्रमाणपत्र सादर करून पैशाचा दावा करू शकता पैशाचा दावा करत असलेल्या व्यक्तीचे बॅकग्राऊंड चेक केले जाते त्यानंतर खातेदाराच्या मृत्युप पत्राची तपासणी केली जाते व तपास णी केल्यानंतर पैसे मागणाऱ्या व्यक्तीला पैसे दिले जाते.
सूचना आपण आपल्या बँक खात्यात नियमित व्यवहार करत रहावे.आपण आपल्या बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती अपडेट ठेवावी.आपण आपल्या कुटुंबाला आपल्या बँक खात्यांबद्दल माहिती द्यावी.