Close Visit Mhshetkari

HSC Board Result : उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर ! येथे पाहता येणार रिझल्ट ….

HSC Board Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.महाराष्ट्रातील पालक व विद्यार्थी अनेक दिवसांपासून निकालाची वाट सतत पाहत होते. आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.

HSC Board Exam Result

ऑनलाईन पद्धतीने २१ मे ला आपला निकाल विद्यार्थी पाहू शकणार आहेत.दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या.राज्यामध्ये तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.

परीक्षा मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

  • mahresult.nic.in
  • http://hscresult.mkcl.org
  • www.mahahsscboard.in
  • https://results.digilocker.gov.in
  • www.tv9marathi.com
  • http://results.targetpublications.org

बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2024

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्याथ्यर्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे. बारावीचा निकाल 9 विभागांमध्ये लागणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment