Home Loan News : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येकाला असे वाटत असते. की आपल्याला आपले हक्काचे घर असावे आणि प्रत्येक व्यक्ती अशी इच्छा ठेवत असतो.
आपल्या परिवारासाठी आपल्याला एक स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाला वाटते. आणि यासाठी ती व्यक्ती आटोकाट प्रयत्न करत असते. पण अलीकडच्या काळामध्ये गृह कर्जाचे व्याजदर वाढले आणि अशा मध्ये घराचे स्वप्न पूर्ण सहज होत नाही.
प्रत्येक जण आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जाचा पर्याय निवडत असतात. आणि गृह कर्ज घेऊन आपल्या हक्काचे घर बनवण्यासाठी मदत होते .
तुम्ही जर नवीन घर बांधण्याच्या विचारात असाल व तुम्हाला गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. आज आपण गृह कर्ज घेऊन सात लाख रुपये कसे वाचवायचे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जॉईंट होम लोन घेतल्यास पैसे कसे वाचणार
तुम्ही जर गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर ते तुम्ही पत्नी किंवा इतर अन्य व्यक्ती सोबत जॉईंट होम लोन तुम्हाला घेता येते. तुम्ही तुमच्या आई सोबत किंवा पत्नी सोबत जॉईंट होम लोन घेतली तर आयकर सवलतीचा तुम्हाला दुहेरी फायदा मिळवता येतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार होम लोन काढल्यास तुम्हाला आयकर कायदा व कलम 80c व कलम 24 बी यानुसार सवलतीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला सांगायचे झाल्यास तुम्ही जॉईंट होम लोन काढले तर तुम्हाला 80 c नुसार दोन्ही कर्जदारांना 1.5 लाखाचे टॅक्स बेनिफिट मिळणार.
समजा तुम्ही जर तुमच्या आई व पत्नी सोबत जॉईंट होम लोन घेतले. तर तुम्हाला दीड लाख रुपयांचे व तुमच्या सह कर्जदारला दीड लाख रुपयाचे म्हणजे एकूण तीन लाख रुपयाचे टॅक्स बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे.
एवढेच नाही तर तुम्ही होम लोन काढल्यास कलम 24 बी नुसार तुम्हाला व तुमच्या सह कर्जदाराला व्याजात प्रत्येकी दोन लाखापर्यंत सूट मिळते. म्हणजेच तुम्हाला दोन लाख रुपये व तुमच्या सह कर्ज दाराला दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये तुम्हाला व्याज सवलत मिळू शकते.
तुम्ही जॉईट होम लोन काढल्यास तीन लाख रुपयांचा टॅक्स बेनिफिट व्याज सवलत चार लाख रुपये असे एकूण सात लाख रुपये तुम्हाला होम लोन जॉईन होम लोन मध्ये वाचवता येईल . अशाप्रकारे तुम्हाला जॉईन होम लोन मध्ये दुहेरी फायदा मिळणार आहे.
या अटींचे पालन करावे लागणार?
- तुम्हाला जर 7 लाखाचा फायदा मिळवायचा असेल तर जॉईंट होम लोन काढत असताना सदर प्रॉपर्टी चे दोन्ही अर्जदार सहमालक असणे आवश्यक आहे.
- जेव्हा तुम्ही घराची नोंद करता त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीची नोंद सह कर्जदार कोबोरॉअर म्हणून करायची आहे.
- तुम्ही जर जॉईंट होम लोन अंतर्गत कर्ज काढल्यास सह कर्जदाराने देखील कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.