Close Visit Mhshetkari

Home Loan : देशातील बँकाचे गृह कर्जाचे व्याजदर कधी कमी होणार ? पहा तज्ञांचे काय मत आहे

Home Loan  : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आपल्याला माहितीच आहे. की आपल्यापैकी अनेक जण घराचे स्वप्न बघत असतात आणि घर बांधायचे म्हटले तर आपल्याला होम लोन घ्यावीच लागते खरे तर आता घराच्या किमती एवढ्या झाल्या आहे. की आता घर घेणे पण अवघड जात आहे.

सामान्यांकडे रोख रक्कम एवढी नसल्याने त्यांना होम लोन ही घ्यावीच लागते. तज्ञांच्या मते देखील गृह कर्ज घेणे ही चांगलीच बाब आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही आनंदी आनंदाची बातमी माहिती करण्यात येत आहे.

तज्ञां कडून मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2024 मध्ये गृह कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात होण्याची शक्यता असणार आहे. गेल्या आपण पाहतच आहोत की काही दिवसापासून मीडिया रिपोर्ट बातम्यांमध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख केला जात आहे. देशातील अनेक बँक देखील आपल्या व्याजदरात कपात होण्याचा असा अंदाज व्यक्त केला आहे .

Home loan interest rate 

मागील वर्षाच्या तुलनेत गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे व्याजदर कमी होणारा सून तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे व्याजदर आता 0.5 टक्के ते 1.25 टक्के एवढे कमी होणार आहे गेल्या दीड वर्षांमध्ये आरबीआयने रेपो रेट तब्बल अडीच टक्क्यांनी वाढवला सोन्याचा परिणाम विविध कर्जाचे व्याजदर झपाट्याने वाढले होते.

हे पण पहा --  Home loan : होम लोन नवीन व्याजदर जाहीर ! पहा विविध बँक व्याजदर यादी..

पण आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करणार असल्याने यामुळे गृह कर्ज वाहन कर्ज याचे व्याजदर देखील कमी होण्यास मदत होणार आहे. गृह कर्जाची व्याजदर कधी कमी होणार याविषयी तज्ञांनी काय मत व्यक्त केले आहे याविषयी माहिती पाहू.

गृह कर्जाच्या व्याजदरात कधी होणार कपात 

गृह कर्जाचे व्याजदर कमी होण्याबाबत बँक ऑफ महाराष्ट्राची एमडी आरए राजीव यांनी यासंदर्भामध्ये एक मोठी बातमी दिली आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून जून जुलै 2024 मध्ये रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता असल्याने गृहकर्जाच्या व्याजदरात देखील कपात होणार आहे.

तसेच कॅनडा बँकेचे कार्यकारी संचालक भावेन्द्र कुमार यांनी सुद्धा याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे काही बँकांनी गृह कर्जाचे व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे महागाई कमी असल्याने बँकांनी हा निर्णय घेतला आहे.

बँकेने आपले जर व्याजदर कमी केले तर सर्वसामान्यांचे घर होईल. आणि यामुळे सर्वांना फायदा होईल हे एक सर्वांसाठी चांगली व महत्त्वाची बातमी आहे.

Leave a Comment