Close Visit Mhshetkari

GMC Bharti 2024 : सातवी दहावी बारावी पास उमेदवारांसाठी आयुर्वेदिक महाविद्यालय व सलग्निक रुग्णालयामध्ये सरकारी नोकरीची संधी; लगेच येथे करा अर्ज

GMC Bharti 2024 : सातवी दहावी बारावी पास उमेदवारांसाठी जिल्हा शासकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व सलग्निक रुग्णालयामध्ये सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहे भरतीची जाहिरात सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती 2024

पदाचे नाव : -सुरक्षारक्षक, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, पहारेकरी, परिचर, सफाईगार, दंत परिचर, वस्तीगृह सेवक, रुग्णपट वाहक, माळी, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया, स्वयंपाकी व इतर पदे

शैक्षणिक पात्रता :- 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण

मासिक वेतन/पगार :- 15,000 ते 46,000 रूपये. (पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन)

अर्ज पद्धती :- ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वेतन/ मानधन :- १५००० – ४७६००/- रुपये पर्यंत.

वयोमर्यादा :- १८ वर्षे ते ३८ वर्षे

भरती कालावधी : -पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे

अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग – १०००/- 

राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – ९००/-

अर्ज सुरू होण्याची दिनांक :- जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.

पदाचे नाव :– गट ड (वर्ग-४)

व्यावसायिक पात्रता :- उमेदवाराकडे संबंधित पदा प्रमाणे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

रिक्त पदे :-0680 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरी ठिकाण :- नागपूर

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक :- 20 जानेवारी 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया :-

1. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. “भरती” टॅबवर क्लिक करा.

3. “गट ड (वर्ग-४) पदांची भरती” या जाहिरातवर क्लिक करा.

4. “ऑनलाइन अर्ज करा” बटणावर क्लिक करा.

5. आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे 

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (मूळ आणि प्रत)
  • जातीचा दाखला (मूळ आणि प्रत)
  • निवास प्रमाणपत्र (मूळ आणि प्रत)
  • वयोमर्यादा सिद्ध करणारे प्रमाणपत्र (मूळ आणि प्रत)
  • छायाचित्र
  • स्वाक्षरी
अटी व शर्ती 
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराने पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या अधिवासातील असणे आवश्यक आहे. उमेदवाराने आवश्यकतेनुसार अधिवास प्रमाणपत्र सादर करावे.
  • उमेदवाराने कागदपत्रांच्या छाननीच्या प्रक्रियेदरम्यान आणि रुजू होताना सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर केली पाहिजेत.

अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यांच्या https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment