Close Visit Mhshetkari

Gharkul yojana : मोठी बातमी…. घरकुल योजने संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित ! आता….

Gharkul yojana : शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी करावयाचा अर्ज व त्यासोबत जोडावयची आवश्यक कागदपत्रे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकसूत्रता ठेवण्यासाठी, शासन परिपत्रकान्वये शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी करावयाचा अर्ज व आवश्यक कागदपत्रांबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रांमध्ये ‘रद्द केलेला धनादेश’ नमूद आहे.

Gharkul Yojana Maharashtra

ग्रामीण भागात / अतिदुर्गम भागात लाभार्थ्यांकडे धनादेश पुस्तिका उपलब्ध नसल्याने घरकुल मंजूर करण्यासाठी अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. सबब, शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी शासन परिपत्रकांन्वये विहित केलेल्या नमुना अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रांमध्ये,रद्द केलेला धनादेशः किंवा (IFSC Code सहीत) बँक खाते पुस्तकाची (Passbook) छायांकित प्रत घेण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शबरी घरकुल योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड ओळखपत्र आणि रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला आणि पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर आणि उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा दाखला – आधार कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • दिव्यांग असल्यास दाखला
  • 7/12 उतारा आणि 8अ 
  • ग्रामपंचायत ना हरकत दाखला
  • बँक खात्याचा तपशील
हे पण पहा --  New Gharkul Yadi : ग्रामपंचायत घरकुल याद्या जाहीर! घरकुल यादी मोबाईलवर कशी पाहायची?

भूमिहीन कुटुंबांना मिळणार घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य

महाराष्ट्र सरकारने पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे.घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाच्या लाभ मिळण्यापासून वंचित आहेत.

सन २०१५-१६ पासून दारिद्रय रेषेखालील भूमिहीन बेघर कुटूंबांना घरकुल बांधकामास जागा खरेदी करण्यासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना” या नावाने योजनेस मान्यता देण्यात येत आहे. 

सदरील योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेतील दारिद्रय रेषेखालील घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.

1 thought on “Gharkul yojana : मोठी बातमी…. घरकुल योजने संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित ! आता….”

Leave a Comment