Fixed Deposit : सुरक्षितनमस्कार मित्रांनो सुरक्षित मिळकतीच्या दृष्टिकोनातून एफडी हा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. सध्याच्या एफ डी वरील व्याज दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत जास्त आहे.
बहुतेक ग्राहकांचा कल एफडी मध्ये गुंतवणूक करण्यामध्ये जास्त आहे. कारण सुरक्षित परतावा मिळतो. तसेच एफडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. मागील दोन वर्षाच्या तुलनेमध्ये एफ डी वरील व्याज जास्त असून लघु वित्त बँक आयएफडीवरील आठ टक्क्याहून अधिक व्याज देत आहे.
एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे का?
सुरक्षित गुंतवणुकीचे एफडी हा एक उत्तम पर्याय आहे. दोन्ही वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्या एफडीवरील व्याज जास्त आहे. देशातील अनेक लघु वित्त बँका८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहे.
Fixed Deposit Interest Rate
एयू स्मॉल फायनान्स बँक : 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 3.75% ते 8% व्याज. 18 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8% व्याज.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 3.5% ते 8.50% व्याज. 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.50% व्याज मिळते.
ESAF स्मॉल फायनान्स बँक : 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 4% ते 8.25% व्याज. 2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 8.25% व्याज मिळते.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 3% ते 8.61% व्याज. 750 दिवसांच्या एफडीवर 8.61% व्याज देते.
जन स्मॉल फायनान्स बँक : 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 3% ते 8.50% व्याज. 365 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.50%व्याज.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 4% ते 8.65% व्याज. 2 वर्षे 2 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.65% व्याज.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : 7 दिवस ते 10 वर्षांसाठी 3.75% ते 8.25% व्याज. 560 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.25% व्याज.
सूचना: एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, बँकेची आर्थिक स्थिती आणि व्याज दर तपासा.
तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता विचारात घ्या.