Close Visit Mhshetkari

Disguised Aadhar Card : आधार कार्डामुळे होणाऱ्या स्कॅमपासून बचाव करायचा आहे? आजच डाऊनलोड करा मास्क्ड आधार कार्ड ! पहा सोपी प्रक्रिया ..

Disguised Aadhar Card : आधार कार्डाचा वापर करून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकींमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.आधार कार्ड वरील माहितीचा वापर करून लोकांना आर्थिक गंडा देखील घातला जात आहे.

ओळखपत्र म्हणून बऱ्याच ठिकाणी मास्क्ड आधार कार्ड वापरता येते.आज आपण मास्क्ड आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे ? या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहे.

मास्क आधार कार्ड डाऊनलोड

भारतातील कुठल्याही नागरिकाचा आयडेंटिटी व्हेरीफिकेशनसाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. मात्र सध्या आधार कार्डचा वापर करुन करण्यात येणाऱ्या फसवणुकींमध्ये वाढ होत आहे. यापासून वाचण्यासाठी मास्क्ड आधार उपयुक्त ठरेल.

मास्क केलेले आधार कार्ड हे तुमच्या नेहमीच्या आधार कार्डासारखेच असते, परंतु त्यात आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक लपलेले असतात, याला मास्क आधार कार्ड म्हणतात.मास्क केलेले आधार कार्ड वापरकर्त्यांची सुरक्षितता वाढवते, जेणेकरून फसवणूक करणारे तुमच्या संपूर्ण आधार क्रमांकाचा गैरवापर करू शकत नाहीत.

आपण मास्क केलेले आधार कार्ड डायरेक्ट डाऊनलोड करू शकत नाही.मास्क केलेल्या आधार कार्डसाठी मास्क केलेले आधार कार्ड निवडण्याचा पर्याय मिळतो.

How To Download Disguised Aadhar Card

आपण डायरेक्ट मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करू शकत नाही. तुम्हाला प्रथम सामान्य आधार कार्ड PDF डाउनलोड करावी लागेल आणि नंतर डाऊनलोड करताना ते मास्क करण्याची निवड करावी लागेल.

हे पण पहा --  Aadhaar Update: घरबसल्या तुमच्या आधारकार्डवरील पत्ता कसा दुरुस्त करायचा ? पहा संपूर्ण प्रक्रिया

1. सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाइटला https://uidai.gov.in/](https://uidai.gov.in/ भेट द्या वर जा.

2. My Aadhaar” विभागावर जा.

3.”Download Aadhaar” पर्यायावर क्लिक करा.

4.आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका आणि “OTP पाठवा” वर क्लिक करा.

5. आधार नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त OTP टाका आणि “Verify and Download” वर क्लिक करा.

6. मास्किंग” पर्याय निवडा.

7. “डाउनलोड” वर क्लिक करा.

8.डाउनलोड केलेल्या PDF फाइलचा पासवर्ड सेट करण्यासाठी तुमचे नाव (पहिली चार अक्षरे मोठ्या अक्षरात) आणि जन्म वर्ष टाका.

9. आधार कार्ड डाउनलोड करा.

आपण डाउनलोड केलेल्या PDF मध्ये तुमची आधार माहिती असेल, परंतु आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक व्यतिरिक्त सर्व माहिती लपविली असेल.PDF फाइल डिजिटलपणे UIDAI द्वारे स्वाक्षरीकृत केली जाईल आणि पडताळणीसाठी QR कोड असेल.

Leave a Comment