Crop insurance : अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतक-यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
अतिवृष्टी नुसकान भरपाई आली!
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बार्बीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. दि.०१.०१.२०२४ च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
आता नोव्हेंबर २०२३ या महिन्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडून दि.०९.०१.२०२४ च्या तीन स्वतंत्र पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत.
नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.१४४१०.६६ लक्ष (अक्षरी रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी दहा लक्ष सहासष्ट हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
Crop insurance list 2024
चालू हंगामामध्ये सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.
शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.२७.०३.२०२३ व दि.१.१.२०२४ नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात येईल.
लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकन्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये,याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करात येणार आहे.