Close Visit Mhshetkari

CNG Pump Dealership : आता असा करा सीएनजी पंप सुरू आणि दरमहा कमावा लाखो रुपये; पहा सर्व ऑनलाईन प्रोसेस ..

CNG Pump Dealership : सीएनजी पंप कसा उघडायचा, काय आवश्यक आहे? GAIL, ONGC, HPCL, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्या महाराष्ट्रात CNG पंप बसवण्याची संधी देतात.सदरील कंपन्यांना सीएनजी पंपांची संख्या वाढवायची आहे.

CNG Pump Dealership 2024

नमस्कार मित्रांनो आपण जर व्यवसाय करण्याचा संदेश शोधत असाल तर आपल्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणि चांगला व्यवसाय आपण शोधून काढला आहे. यासाठी आपल्याकडे जागा आणि भांडवल पुरेसं असणे आवश्यक आहे. आज आपण CNG पंप बसवण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती देत आहोत.

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे परिणामी ग्राहकांचा ओढा सीएनजी गाड्यांकडे पळालेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे शहरातील सध्या असलेल्या पेट्रोल पंपावर सीएनजी सुविधा उपलब्ध नाही. बऱ्याच पेट्रोल पंपांवर सीएनजी सुविधा देण्यासाठी पुरेशी जागा नाही.

CNG Pump Dealership online Apply

मित्रांनो GAIL, ONGC, HPCL, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्या महाराष्ट्रात CNG पंप बसवण्याची संधी देतात. सदरील कंपन्यांना सीएनजी पंपांची संख्या वाढवायची आहे.सीएनजी स्टेशन उघडून चांगले उत्पन्न मिळवू शकता.

सीएनजी स्टेशन पात्रता 

  • सीएनजी पंप लावायचा असेल तर सर्वात आधी 400 ते 1225 चौरस फूट योग्य जमीन आवश्यक आहे 
  • जमीन किंवा भूखंड मुख्य रस्त्याला जसे, महामार्ग, शहराचा मुख्य रस्ता इ. शेजारील असावा.
  • सीएनजी स्टेशन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची रुंदी (आत) शहरात 20 मीटर, महामार्ग किंवा राज्य मार्गाच्या बाबतीत 35 मीटर असावी.
  • आपण भाडेतत्त्वावरही जमीन घेऊ शकता. यासाठी जमीन मालकाकडून NOC घ्यावी लागते आणि करार करावा लागतो.
  • अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. 
  • वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेशी एफडी, बँक बॅलन्स उपलब्ध असणे आवश्यक आहे. 
  • वीज व पाणी उपलब्ध असले पाहिजे.

Leave a Comment